
Trump and Mark Carney
हे देखील वाचा : Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
अमेरिकेच्या व्हाईट हाईसने दिलेल्या माहितीनुसार, नव्या टॅरिफची अंमलबाजावणी १९ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प सरकारने अमेरिकन वाहन उद्योग, मद्य आणि दुग्धजन्य उत्पादनांवर कॅनडाने भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
व्हाईट हाउसच्या माहितीनुसार, कलम ३३८ अतंर्गत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तीन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये युनायटेड स्टेट्स-मेक्सिको-कॅनडा करार अंतर्गत कर सवलत देण्यात आलेल्या वस्तूंवरही ५०% टॅरिफ लादण्यात आले आहे. मात्र, उर्जा उत्पादने, पोटॅश, मासे तसेच इतरा काही महत्त्वाची खनिजे वगळण्यात आली आहे. यामुळे धोरणात्मक वस्तूंवरील व्यापार सध्या सुरु राहणार आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर कॅनडाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ओंटारियोचे प्रमुख डग फोर्ड यांनी अमेरिकेच्या निर्णयाला प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. डॉलरच्या बदल्यात डॉलर, टॅरिफच्या बदल्यात टॅरिफ या मूल्यावर कॅनडा कारवाई करेल असे त्यांनी म्हटले.
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम केवळ अमेरिका-कॅनडापर्यंत मर्यादित राहणार नाही. आयात शुल्क वाढल्याने वस्तूंच्या किमती वाढतील ज्याचा ग्राहकांना फटका बसेल. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आणि भू-राजकीय तणावामुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती याम निर्णयामुळे व्यापार युद्ध सुरु होऊ शकते.
अमेरिकेच्या या निर्णयावर कॅनडा काय उत्तर देईल. दोन्ही देशांमध्ये व्यापार तणावाचा जगातिक परिणाम होईल काय याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : US-Iran War : अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर ट्रम्प आक्रमक; इराणला किंमत मोजावी लागणार