Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?

Beed Inspirational Story: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ४७ वर्षीय रामाबाई रणवीर यांनी चप्पल तुटल्यानंतरही अनवाणी पायांनी धावत 'अमृत दौड' मॅरेथॉन कशी जिंकली आणि मिळालेल्या बक्षीसाचा कसा सदुपयोग केला? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 10:01 AM
BEED

BEED

Follow Us
Follow Us:

Beed Inspirational Story: मुलांच्या प्रेमापोटी आईचे समर्पण, त्याग आणि पराकाष्टेची भावना वेळोवेळी आपल्या नजरेस पडत असते. अशीच एक यशोगाथा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ४७ वर्षीय रामाबाई रणवीर यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या जिद्दीची आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर एज्युकेशनल कॉम्प्लेक्सतर्फे अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त ‘अमृत दौड’ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत अंबाजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाग्यनगर चौक अशी पार पडली.

अडथळ्यासमोर हार मानली नाही

या मॅराथनमध्ये कोणतेही स्पोर्ट्स शूज किंवा ट्रॅक सूट न घालता, साध्या साडीत आणि चप्पल घालून रामाबाईं या स्पर्धेत सहभागी झाल्या. चप्पल वारंवार घसरल्यामुळे त्यांचा वेगावर प्रभाव पडू लागला होता. काहीच क्षणात धावण्याच्या शर्यती दरम्यान चप्पल तुटली. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चप्पल हातात घेतली आणि रस्त्यावरील टोकदार दगड व खडबडीत मार्गाची पर्वा न करता अनवाणी पायांनीच धावणे सुरू ठेवले.

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज

साडी सावरत अनवाणी पायांनी मॅरेथॉन जिंकली

साडी सावरत आणि अनवाणी पायांनी धावत त्यांनी इतर सर्व स्पर्धकांना मागे सोडत ही मॅरेथॉन जिंकली. या विजयाची दखल म्हणून त्यांना ३,००० रुपयांचे रोख इनाम मिळाले, ज्याचा वापर त्यांनी पूर्णपणे आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आईचे आपल्या मुलांच्या भविष्यासाठीचे हे समर्पण सर्वांचे मन जिंकणारे ठरले आहे.

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!

संघर्षांचे एक उत्तम उदाहरण

आज कित्येक पालक आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी लाखो करोडोंचा खर्च करताना दिसतात. मात्र त्यात काही पालक असेही आहेत, ज्यांना आपल्या जगण्यासोबतच मुलांच्या शिक्षणासाठी काही हजार रुपयांची रक्कम मिळवणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना काही हजारांसाठी संघर्ष करावा लागतो. रामाबाई रणवीर यांचे उदाहरण त्यापैकीच एक आहे, जे गरीब परिस्थितीच्या वेदना दाखवते.

Web Title: Rambai ranvir beed inspirational story marathon 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Beed
  • education
  • inspiration

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
4

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.