Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Beed Viral Video : मुलगी शाळेत बेशुद्ध पडली, वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून रुग्णवाहिकेने सुविधा देण्यास दिला नकार. घटना महाराष्ट्राच्या बीड शहरातून समोर येत असून याचे विदारक दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2026 | 10:57 AM
गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर;बीडमधील Video Viral

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर;बीडमधील Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये शाळेत अचानक फिट आल्याने ११ वर्षीय मुलगी बेशुद्ध पडली.
  • मुलीला पुढील उपचारांसाठी नेताना रुग्णवाहिकेत पैशांवरून वाद झाल्याचा आरोप.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; आपत्कालीन आरोग्यसेवेवर उपस्थित झाले प्रश्न.
महाराष्ट्राच्या बीड राज्यातून एक अत्यंत निर्दयी घटना समोर येत आहे. माहितीनुसार, एका ११ वर्षीय मुलीला शाळेत फिट आल्याने ती बेशुद्ध पडली. यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीला रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण पैसे नसल्याने रुग्णवाहिकेने रस्त्यातच त्यांना गाडीतून उतरवले. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात वडिल मुलीला खांद्यावर घेऊन रुग्णवाहिकेतून बाहेर निघतना दिसले. या घटनेमुळे आता यूजर्समध्ये संतापाची लाट उसळली असून रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केलेली आहे.

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

शाळेत अचानक बेशुद्ध पडली मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ सप्टेंबर रोजी दिंडरूड गावात घडून आली. शाळेत पाचवीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थीनीला अचानक फिट आवी आणि ती वर्गातच बेशुद्ध पडली. परिस्थितीच्या गंभीरतेकडे पाहत शिक्षकांनी तिला तात्काळ दिंडरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांनी मुलीच्या प्रकृतीची तपासणी करून तिला पुढील उपचारांसाठी पाठवले.

रुग्णवाहिका भाड्याने घेण्यावरुन झाला वाद

आरोप आहे की, रुग्णालयाकडून रेफर केल्यानंतर कुटुंबाला रुग्णवाहिकेची सुविधा तर दिली गेली होती परंतु पैशांवरुन रस्त्यातच वाद सुरु झाला होता. मुलीचे वडिल कथितरित्या चालकाने मागितलेले पैसे देण्यास सक्षम नव्हते. याच कारणामुळे मुलीला आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून उतरण्यास सांगितले गेले. या घटनेचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मिडियावर घटनेला शेअर केले.

कर्मचाऱ्यांनी थोडीही माणुसकी न दाखवता, आजारी मुलीला असे रुग्णवाहिकेतून बाहेर काढल्याने नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत. अनेक यूजर्सने व्हायरल व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “शेवटी त्याने बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेतलं आणि मागोमाग हतबल आजी चालत निघाली. मोफत १०८ रुग्णवाहिका का बोलावली नाही? “रुग्णवाहिका फक्त गर्भवतींसाठी” हा नियम नेमका कुणासाठी आहे? ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’चा गाजावाजा होत असताना एक गरीब मुलीचा जीव डिझेलच्या पैशांत का अडकला?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलीच्या जीवाहून जास्त प्यारा पैसा झाला त्यांना”.

शाळेत फिट येऊन बेशुद्ध पडलेल्या ११ वर्षांच्या मुलीला पुढच्या उपचारांसाठी नेण्याची वेळ आली. पण बीड जिल्ह्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने तिच्या कुटुंबाकडे आधी डिझेलचे पैसे मागितल्याचा आरोप आहे. आई नसलेल्या, हमाली करणाऱ्या बापाकडे पैसे नव्हते. https://t.co/tysedVDv2h — Praveen Gavit (@praveengavit11) October 14, 2026

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

आईचे झाले निधन

सांगितले जात आहे की, मुलीच्या आईचे आधीच निधन झाले आहे. कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असून वडिल मजूराचे काम करत आहेत. त्यांना एकूण चार मुले आहेत. अशा वाईट परिस्थितीत मुलीवर दया न दाखवता फक्त काही पैशांसाठी तिला आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढणे ही घटना मनाला सुन्न करुन जाते.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Beed 11 year old girl ambulance payment dispute viral video maharashtra healthcare nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Beed
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
1

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
2

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
3

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
4

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.