Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: सरकारी भरती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; खुल्या प्रवर्गातील जागा सर्वांसाठी खुल्या

ऑगस्ट २०२२ मधील भरती प्रक्रियेशी संबंधित हे प्रकरण आहे. राजस्थान हायकोर्ट, इतर अधिनस्थ न्यायालये तसेच संबंधित संस्थांमध्ये कनिष्ठ न्यायिक सहायक आणि लेखनिक गट-२च्या एकूण २,७५६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 05, 2026 | 12:50 PM
Supreme Court Reservation Verdict, Government Recruitment,

Supreme Court Reservation Verdict, Government Recruitment,

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाचा सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल
  • ऑगस्ट २०२२ मधील भरती प्रक्रियेशी संबंधित प्रकरण
  • खुल्या प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गातच गणले जाईल
Supreme Court reservation clarification: सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. खुल्या प्रवर्गातील जागांवर SC, ST, OBC तसेच अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाही गुणांच्या आधारे तितकाच अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांना केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गापुरते मर्यादित करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. खुल्या प्रवर्गाचा कोटा हा कोणत्याही विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित नसून तो सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी खुला असतो, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि रजिस्ट्रार यांनी यासंबंधी याचिकां दाखल केल्या होत्या. या याचिकांवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्ट प्रशासन आणि रजिस्ट्रारच्या याचिका फेटाळत १८ सप्टेंबर २०२३ रोजीचा राजस्थान हायकोर्टाचा निकालही कायम ठेवला.

Supreme Court News: उमर खालिद व शरजील इमाम यांना जामीन मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल देणार?

 

राजस्थानमधील भरती प्रक्रियेतील वाद

ऑगस्ट २०२२ मधील भरती प्रक्रियेशी संबंधित हे प्रकरण आहे. राजस्थान हायकोर्ट, इतर अधिनस्थ न्यायालये तसेच संबंधित संस्थांमध्ये कनिष्ठ न्यायिक सहायक आणि लेखनिक गट-२च्या एकूण २,७५६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत प्रत्येक प्रवर्गातील रिक्त जागांच्या पाचपट उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे टायपिंग चाचणीसाठी निवड होणार होती.

लेखी परीक्षेचा निकाल मे २०२३ मध्ये जाहीर झाला. त्यामध्ये एससी, ओबीसी, एमबीसी, ईडब्ल्युएस आणि अन्य आरक्षित प्रवर्गांचे कटऑफ गुण खुल्या प्रवर्गापेक्षा अधिक होते. मात्र, खुल्या प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवूनही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आले आणि त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आला नाही. या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी राजस्थान हायकोर्टात धाव घेतली असून भरती प्रक्रियेवर वाद निर्माण झाला आहे.

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

खुल्या प्रवर्गातील निवड गुणवत्तेवरच

राजस्थान हायकोर्टाने उमेदवारांच्या याचिकेवर सुनावणी झाली. गुणवत्ता यादी प्रवर्गानुसार केली असली तरी प्रथम गुणांच्या आधारावर खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी तयार करणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गातच गणले जाईल आणि नंतर त्यांचा समावेश आरक्षित यादीत करता येणार नाही. एखाद्या उमेदवाराला केवळ जात किंवा प्रवर्गाच्या आधारे खुल्या स्पर्धेतून वगळता येत नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले होते. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही सहमती दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने, खुल्या प्रवर्गाचा अर्थ म्हणजे अशा जागा ज्या सर्वांसाठी खुल्या असतात आणि त्याठिकाणी जात, प्रवर्ग किंवा लिंगाच्या आधारे आरक्षण लागू होत नाही. आरक्षित प्रवर्गातील उमेदवार पुढील निवड प्रक्रियेतही गुणवत्ता कायम राखत असल्यास त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणूनच मानले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Supreme court supreme court clarifies reservation policy open category posts open to all on merit basis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • OBC Reservation
  • Rajsthan
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Supreme Court News: उमर खालिद व शरजील इमाम यांना जामीन मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल देणार?
1

Supreme Court News: उमर खालिद व शरजील इमाम यांना जामीन मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.