School Admission Age Limit 2027-28: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आतापर्यंत प्रत्येक बोर्डाचे वेगवेगळे नियम होते. राज्य मंडळाचे वेगळे, CBSE चे वेगळे, ICSE चे वेगळे. त्यामुळे पालकांचा गोंधळ उडायचा. एका शाळेत वय वेगळे लागायचे तर दुसऱ्या शाळेत वेगळे. हे सगळे थांबवण्यासाठी सरकारने आता सगळ्यांसाठी एकच नियम केला आहे. School Admission Age Limit 2027-28:
सरकारने टप्प्याटप्प्याने वय वाढवण्याचे ठरवले आहे.2027-28 पासून नर्सरीसाठी: 30 जून 2027 पर्यंत ज्या मुलाचे वय 3 वर्षे पूर्ण झाले असेल त्यालाच नर्सरी म्हणजे बालवाटिका-1 मध्ये प्रवेश मिळेल.2028-29 पासून ज्युनिअर केजीसाठी: 30 जून पर्यंत 4 वर्षे पूर्ण पाहिजेत.2029-30 पासून सिनिअर केजीसाठी: 30 जून पर्यंत 5 वर्षे पूर्ण पाहिजेत.2030-31 पासून पहिलीसाठी: 30 जून पर्यंत 6 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.म्हणजे आता पहिलीत जायचे असेल तर 6 वर्षे पूर्ण झालेली असावीच लागतील. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ठरवले आहे. केंद्र सरकारने पण सांगितले होते की पहिलीला जाणाऱ्या मुलाचे वय 6 वर्षे असावे.
अनेक पालकांना टेन्शन आले असेल की आमचे मूल तर आधीच शाळेत आहे, त्याचे काय होणार? तर घाबरायचे कारण नाही.जो मुलगा 2026-27 मध्ये नर्सरी ते पहिलीमध्ये शिकत आहे, त्याला हा नवीन नियम लागू होणार नाही. तो जसा पुढच्या वर्गात जाईल तसा जाईल. त्याला अडवले जाणार नाही. तसेच जी मुले एका वर्गातून पास होऊन पुढच्या वर्गात जात आहेत, त्या नियमित विद्यार्थ्यांना पण या नियमातून सूट दिली आहे. हा नियम फक्त नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी आहे.
Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही? कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या नियम आणि पात्रता
सरकारने थोडा दिलासा पण दिला आहे. कधी कधी मुलाचे वय 5-10 दिवसांनी कमी पडते. अशा वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना 15 दिवसांपर्यंत सूट देण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे जर 30 जूनला 3 वर्षे पूर्ण व्हायला 10 दिवस कमी पडत असतील तर मुख्याध्यापक प्रवेश देऊ शकतात.यापुढे सगळ्या शाळांमध्ये प्रवेशाचे वय सारखेच असेल. पालकांना शाळा शोधताना वयाचा गोंधळ होणार नाही. लहान वयात मुलांना शाळेत टाकण्याची जी घाई पालक करायचे ती आता थांबेल. तज्ञांच्या मते 3 वर्षापूर्वी मुलांना शाळेत टाकणे योग्य नाही आणि 6 वर्षापूर्वी पहिलीत टाकणे पण योग्य नाही. त्यामुळे हा निर्णय मुलांच्या हिताचाच आहे असे बोलले जात आहे.






