Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कठोर कारवाई; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा थेट इशारा

खासगी शाळा विविध प्रकारांची यादी दाखवत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र आता यावर राज्य सरकारने कठोर आदेश दिला आहे. जर RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं तर अशा शाळांना आता राज्याचा दणका बसणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 24, 2026 | 02:48 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात
  • राज्य सरकारने कठोर आदेश दिला
  • अन्यथा संबंधित शाळांवर कठोर कारवाई
RTE Admission Fees : सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात. खासगी शाळा विविध प्रकारांची यादी दाखवत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र आता यावर राज्य सरकारने कठोर आदेश दिला आहे. जर RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं तर अशा शाळांना आता राज्याचा दणका बसणार आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये ‘मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करणे बेकायदेशीर आहे. जर कोणत्याही शाळेने शुल्काच्या किंवा शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांकडून पैसे घेतले असतील, तर ते पालकांना परत करावे लागतील, अन्यथा संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत मांडली.

भारतात वाढतोय ‘Portfolio Career’ चा क्रेझ, काय आहे ‘हा’ ट्रेन्ड आणि तरुणाईला का करतोय आकर्षित?

लक्षवेधी सूचनेला उत्तर

विधानसभेत सदस्य योगेश सागर यांनी आरटीई प्रवेशातील अडचणी आणि शाळांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नियमानुसार, खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आरटीई अंतर्गत राखीव ठेवणे बंधनकारक असून, या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासन करत असते.

२९०० कोटींची प्रतिपूर्ती थकीत

शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले की, राज्य पातळीवर शाळांची सुमारे २९०० कोटी रुपयांची शुल्क प्रतिपूर्ती सध्या थकीत आहे. मात्र, शासनाकडून निधी मिळण्यास उशीर होत असला तरी, त्याचा फटका विद्यार्थ्यांना किंवा पालकांना बसता कामा नये. शाळांनी या कारणास्तव विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

१ जुलै २०१५ च्या शासन निर्णयाची आठवण

मंत्री भुसे म्हणाले की, “या संदर्भात १ जुलै २०१५ रोजीच राज्य शासनाने स्पष्ट शासन निर्णय निर्गमित केला आहे. शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये, अशा कडक सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. ज्या शाळा या नियमाचे उल्लंघन करतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

शाळा बंद होणार नाहीत

काही शाळांनी निधीअभावी शाळा बंद करण्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या, त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, “कोणतीही शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. येणाऱ्या काळात जसा निधी उपलब्ध होईल, तशी शाळांची प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने दिली जातील.” जर तुमच्या पाल्याचा प्रवेश आरटीई अंतर्गत झाला असेल आणि शाळा गणवेश, पुस्तके किंवा इतर साहित्यासाठी पैशांची मागणी करत असेल, तर पालक आता शिक्षण विभागाकडे तक्रार करू शकतात. संबंधित शाळांना ते पैसे परत करण्याचे निर्देश सरकार देणार आहे.

लाखोंचं बक्षीस, लॅपटॉप आणि नवी ओळख… 12 वीच्या टॉपर्सना मिळणार आता ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Web Title: Rte admission fees maharashtra school education minister warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education news
  • Education News in Marathi
  • Minister Dada Bhuse

संबंधित बातम्या

आता एकही रुपया व्याज न भरता पूर्ण करा उच्च शिक्षण; ‘या’ सरकारी योजनेमुळे पालकांचा ताण होईल हलका
1

आता एकही रुपया व्याज न भरता पूर्ण करा उच्च शिक्षण; ‘या’ सरकारी योजनेमुळे पालकांचा ताण होईल हलका

Military School मध्ये कसा मिळतो प्रवेश? या शाळेत शिकू शकतात का सामान्य माणसांची मुलं, वाचा माहिती
2

Military School मध्ये कसा मिळतो प्रवेश? या शाळेत शिकू शकतात का सामान्य माणसांची मुलं, वाचा माहिती

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत
3

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.