फोटो सौजन्य- सोशल मीडिया
या मुलाखती सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार असून त्यासाठी ठिकाण ‘आरोग्य विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद सातारा’ हे निश्चित करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या वेळेत होईल, कागदपत्रांची पडताळणी दुपारी २:०० ते ३:०० दरम्यान केली जाईल आणि त्यानंतर दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्ती दिली जाईल.
1. ही सर्व पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून शासनाच्या ११ महिन्यांच्या करारतत्वावर असणार आहेत.
2. किमान सहा महिने काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचाच या भरतीमध्ये प्रामुख्याने विचार केला जाईल.
3. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे (MBBS गुणपत्रिका, प्रमाणपत्र, MMC रजिस्ट्रेशन, अनुभव प्रमाणपत्र) आणि त्यांच्या साक्षांकित छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
4. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
5. नियुक्तीचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा यांच्याकडे राहतील.
6. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी जाहीर निवेदनाद्वारे कळवले आहे.






