Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील आगामी परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2026 | 03:43 PM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

Follow Us
Follow Us:
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय
  • परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार
  • विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांना नियम लागू
पुणे/सोनाजी गाढवे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील आगामी परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रथम सत्रातील परीक्षांपूर्वी हे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

 

परीक्षा केंद्रासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि संचालकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. प्राप्त अर्जाची पडताळणी दिनांक १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान करण्यात येत आहे. यानंतर दिनांक २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठाची विशेष समिती संबंधित परीक्षा केंद्रांची प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पाहणी करणार आहे. परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांना १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेत ‘ऑक्टोबर-नोव्हेंबर’ परीक्षांपूर्वी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.

जवळच्या केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था

लेखापरीक्षण मध्ये त्रुटी आढळल्यामुळे एखाद्या महाविद्यालयाला परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली नाही, तर त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जवळच्या मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. अशा परिस्थितीत संबंधित महाविद्यालयाने त्या परीक्षा केंद्राला आवश्यक मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

हे सुद्धा वाचा : सातारा जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

चार भागातील संस्थांना नियम लागू

परीक्षा केंद्रांच्या लेखापरीक्षणाचा हा नियम पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांसह दादरा व नगर हवेली येथील पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांना लागू राहणार आहे. या प्रक्रियेमुळे परीक्षा केंद्रांमधील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि परीक्षा संचालनाची तयारी यांची तपासणी होऊन परीक्षा अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यास मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Web Title: Savitribai phule pune university has taken an important decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • pune news
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
1

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
2

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
3

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
4

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.