Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Bharti: बँकिंग क्षेत्रात १२ हजारांहून अधिक जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी, ८ जूनपूर्वी करा अर्ज!

Mega Bank Bharti: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) ने पदवीधरांसाठी १२,००० पेक्षा जास्त पदांवर अप्रेंटिसशिप भरती सुरू केली आहे. बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या या पदांसाठी निवड प्रक्रिया कशी असेल आणि उमेदवारांना स्टायपेंड किती मिळणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 04:02 PM
Mega Bank Bharti

Mega Bank Bharti

Follow Us
Follow Us:

Mega Bank Bharti: सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खूशखबर आहे. देशातील प्रमुख सरकारी बँकांनी अप्रेंटिसशिप (प्रशिक्षणार्थी) कार्यक्रमांतर्गत १२,००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही संधी विशेषतः पदवी (Graduation) शिक्षण पूर्ण केलेल्या आणि  बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव घेऊ इच्छित असणाऱ्या उमे्द्वारांसाठी आहे.

बँकांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार या पदासाठी  ८ जूनपर्यंत बंँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग कार्यप्रणाली, ग्राहक सेवा, डिजिटल बँकिंग आणि इतर वित्तीय सेवांशी संबंधित काम शिकण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, वयोमर्यादा आणि इतर पात्रतेच्या अटी संबंधित बँकेच्या अधिसूचनेनुसार ठरवल्या गेल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

SBI आणि BOB मध्ये बंपर जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये ही अप्रेंटिस भरती निघाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): एकूण ७,१५० अप्रेंटिस जागा रिक्त आहेत.

बँक ऑफ बडोदा (BOB): एकूण ५,००० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या दोन्ही भरतींसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक उमेद्वार ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

कशी असेल निवड प्रक्रिया?

उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, स्थानिक भाषेचे ज्ञान आणि कागदपत्र पडताळणी (Document Verification) यांच्या आधारे केली जाईल. काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय चाचणी (Medical Fitness) प्रक्रिया देखील असू शकते. निवडलेल्या उमेदवारांना निश्चित कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल, ज्या दरम्यान त्यांना दरमहा स्टायपेंड (मानधन) देखील दिले जाणार आहे.

का महत्त्वाची आहे ही संधी?

हा अप्रेंटिसशिप यापदाचे काम हे तरुणांना बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी देतो. यामुळे केवळ कामाचा अनुभवच मिळत नाही, तर भविष्यात बँक क्लर्क, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मोठी मदत होते. या भरतीमुळे फ्रेशर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील बारकावे शिकता येतात.

SBI Bank Manager: पदवी पूर्ण होताच बँक अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी; ‘या’ एका परीक्षेमुळे थेट मिळेल असिस्टंट मॅनेजर पद!

Web Title: Sbi bob bank bharti apprentice recruitment 2026 12000 graduation apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Bank
  • Bank OF Baroda
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग
1

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या
2

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांची सरशी; मालमत्तेत मोठी वाढ, निव्वळ नफ्यातही रेकॉर्डब्रेक सुधारणा
3

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांची सरशी; मालमत्तेत मोठी वाढ, निव्वळ नफ्यातही रेकॉर्डब्रेक सुधारणा

Royal Enfield Classic 350 खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 लाख डाउन पेमेंटनंतर दर महिन्याला किती भरावा लागेल EMI?
4

Royal Enfield Classic 350 खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 लाख डाउन पेमेंटनंतर दर महिन्याला किती भरावा लागेल EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.