SBI: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मुंबईने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई येथे एकूण १० पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
SBI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १० कंत्राटी पदांसाठी भरती
मुंबई आणि नवी मुंबई.
लेखी परीक्षा नाही
सरकारी बँकेतनोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबईने नवीन भरती काढली आहे. ही भरती स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणजेच SCO या पदांसाठी आहे. एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत आणि ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे.जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असेल आणि मुंबई, नवी मुंबईत काम करायची इच्छा असेल तर हा चान्स सोडू नका. अर्जाची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2026 आहे. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे sbi.co.in या वेबसाईटवर.
कोणती पदे भरली जाणार आहेत?
या भरतीमध्ये एक-दोन नाही तर 8 वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत.
हेड सेल्स – 01 जागासेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) – 02 जागा
मॅनेजर (बिझनेस प्रोसेस) – 01 जागा
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) – 01 जागा
सेंट्रल ऑपरेशन्स टीम सपोर्ट – 01 जागा
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट- 01 जागा
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (डिजिटल मार्केटिंग) – 02 जागा
कंटेंट स्पेशलिस्ट – 01 जागा
अशी मिळून एकूण 10 पदे आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई असेल.शिक्षण काय लागेल?प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगळे मागितले आहे, पण बेसिकली ग्रॅज्युएशन आणि MBA वाल्यांसाठी ही भरती आहे.
हेड सेल्स आणि रिसर्च टीम: MBA / PGDM पूर्ण असणे गरजेचे. सोबत CFP, CFA किंवा NISM चे सर्टिफिकेट असेल तर प्राधान्य मिळेल.
मॅनेजर पद: MBA / PGDM झालेला असावा.
टेक्नॉलॉजी (प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर): BE / B.Tech / ME / M.Tech किंवा MBA / MMS / PGDM असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
COT सपोर्ट: फक्त ग्रॅज्युएशन झालेले असले तरी चालेल, पण कामाचा अनुभव पाहिजे.
डिजिटल आणि ॲनालिटिकल मार्केटिंग (DVP): सायन्स मधील डिग्री आवश्यक.
कंटेंट स्पेशलिस्ट: मार्केटिंग, जर्नलिझम, कम्युनिकेशन किंवा अॅडव्हर्टायझिंगमध्ये डिग्री लागेल.
महत्वाचे: सर्व पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे, फ्रेशर्ससाठी ही भरती नाही.
पगार किती मिळणार?
हेड सेल्स – वर्षाला 199 लाखापर्यंत CTC
सेंट्रल रिसर्च टीम लीड – 77.20 लाख
मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर – 47.20 लाख
COT सपोर्ट – 37.20 लाख
दोन्ही DVP पदांसाठी – 63 लाख
कंटेंट स्पेशलिस्ट – 19 लाख
वयाची अट काय आहे?
हेड सेल्ससाठी 40 ते 52 वर्षे.
रिसर्च टीम, DVP पदांसाठी 30 ते 45 आणि 33 ते 45 वर्षे.
मॅनेजर, टेक्नॉलॉजी मॅनेजर, COT आणि कंटेंटसाठी 25 ते 40 किंवा 30 ते 40 वर्षे अशी अट आहे.
फी आणि निवड कशी होणार?
जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना फी नाहीये.
यामध्ये कसलीही लेखी परीक्षा नाहीये. मुलाखतीनंतर सिलेक्शन होईल. त्यावर CTC ठरवला जाईल.