
फोटो सौजन्य - Social Media
बिबट्याचे भ्रमण असणाऱ्या भागामध्ये शाळा सकाळी साडे ९ वाजता भरवण्यात येणार आहेत तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत या शाळा सुटणार आहेत. शाळा जास्त लवकर आणि ना उशीर करता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेण्यात आली आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या जाहीर वेळांमध्ये भरवण्यात तसेच सोडण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना परिपाठात सुरक्षिततेविषयी ज्ञान देण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये पालक मेळावे आयोजित करून पालकांना या काळातील त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे. आपला विद्यार्थी शाळेत सुखरूप पोहचला की नाही याची खात्री पालकांनी करणे पालकांची जबाबदारी आहे तर आपला विद्यार्थी शाळा सुटल्यावर त्याच्या घरी नीट पोहचला की नाही याची शहनिशा करणे प्रत्येक वर्गशिक्षकाचे कर्तव्य आहे. (Ahilyanagar)
आपल्या विभागातील किती शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे? याची संपूर्ण माहिती स्थानिक शिक्षणाधिकाऱ्याला त्वरित देण्याचे आदेश काढण्यात आले आहे आणि प्रत्येक शाळेने, शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्थानिक शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निदेशांचे पालन करावे अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. हल्लीच एक बातमी समोर आली होती की जिल्हयात दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केला होता आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. बिबट्याचे हे प्रमाण पारनेर तसेच अहिल्यानगर तालुक्यांमध्ये वाढत जात आहे. गावाकडे मुले शाळेत पायीच जात असतात त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. (Leopard Attacks in Nashik)