फोटो सौजन्य - Social Media
कार्यक्रमाची सुरुवात स्वाती पाटील आणि वनिता सावंत यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना सविता हेंडवे यांनी केली, तर पाहुण्यांचा परिचय वनिता सावंत यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेह कासारे यांनी कुशलतेने सांभाळले. प्रमुख पाहुणे डॉ. अय्यर आणि सुरज भोईर यांनी प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्त्यांचे महत्त्व, समाजातील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या यांविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि समर्पण या गुणांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सजग आणि समाजहिताची भावना बाळगणारे कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी अपेक्षा दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुंबईतील चेंबूर परिसरात पंचरत्न मित्र मंडळ आरसीएफ आणि युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य व शालेय वस्तूंचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २०० विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, पाऊच यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी आवश्यक कपाट, टेबल-खुर्च्या यांचाही पुरवठा करण्यात आला. विशेषतः मुलींच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून ७५ मुलींना १५० सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वित्त संचालक नजहत शेख, महाव्यवस्थापक संजय पेटकर, सीसीएनसीएसआर आरसीएफचे डॉ. रजनीश कुमार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रमा सिंग उपस्थित होत्या. नजहत शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ता घडविण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यापर्यंत अशा विविध उपक्रमांतून सामाजिक संस्थांनी उचललेली भूमिका कौतुकास्पद ठरत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे या दोन्ही कार्यक्रमांतून अधोरेखित होते.






