Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड ; सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेची माजी विद्यार्थिनी, स्वरा नंदिनी नितीन बामगुडे हिची रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 21, 2025 | 01:39 PM
रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड ; सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप
Follow Us
Close
Follow Us:
  • रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड
  • स्वरा बामगुडेची स्वप्नपूर्ती
  • सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप
माणगाव :  माणगाव शहराच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राला अभिमान वाटावा, अशी आनंदाची बातमी समोर आली आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेची माजी विद्यार्थिनी, स्वरा नंदिनी नितीन बामगुडे हिची रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली असून, तिच्या या यशाने संपूर्ण माणगाव शहर भारावून गेले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर जिल्हास्तरावर आपले नाव कोरणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी यशकथा ठरली आहे.

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात पोलिस-विद्यार्थ्यांत झटापट; ज्युबली फीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

स्वरा ही केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नाही, तर अभ्यासातही तितकीच चमकदार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावणारी स्वरा सध्या नवी मुंबईच्या नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही आपली वाटचाल ती तितक्याच आत्मविश्वासाने करत असून, येथील भव्य स्टेडियममध्ये भारतरत्न ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीत ती नियमित सराव करत आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप

स्वरा बामगुडे हिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार – अनिकेत तटकरे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे, सर्व संचालक, चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, शिक्षकवृंद तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे मनापासून अभिनंदन केले आहे. आज स्वरा बामगुडेचे यश हे माणगावमधील अनेक मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे. कष्ट, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ग्रामीण भागातील मुलीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात, याचा जिवंत दाखला म्हणजेच स्वरा बामगुडे होय.

शाळेत शिकत असताना क्रिकेटच्या खेळाचे धडे

माणगाव येथील शिपुरकर व वाघरे शाळेत शिक्षण घेत असतानाच स्वराने क्रिकेटची स्वप्ने पाहायला सुरुवात केली. पहाटे सकाळी सहा वाजता धनसे मैदानावर घाम गाळत घेतलेले क्रिकेटचे प्राथमिक धडे आज तिच्या यशाचा मजबूत पाया ठरले आहेत. या प्रवासात शाळेच्या व्यवस्थापनाने, शिक्षकांनी आणि क्रीडा प्रशिक्षकांनी तसेच आई नंदिनी व वडील नितीन बामगुडे यांनी तिला वेळोवेळी प्रोत्साहन देत तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ दिले.’

लवकरच राज्यात रायगडचे प्रतिनिधित्व करताना दिसेल

दररोज तीन सत्रांत कठोर सराव करत स्वरा ही यष्टिरक्षक आणि आघाडीची फलंदाज असल्याने ती दुहेरी मेहनत घेत आहे. तिच्या खेळातील सातत्य, पाहून महाराष्ट्र राज्य क्रिकेट निवड समितीने तिला रायगड जिल्हा क्रिकेट संघात महत्त्वाचे स्थान देत माणगावच्या या उदयोन्मुख प्रतिभेचा गौरव केला आहे. लवकरच ती महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मुंबई विद्यापीठाची भरती गेली लांबणीवर! अर्ज कर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वराने क्रिकेटची सुरुवात कधी व कुठे केली?

    Ans: शाळेत शिक्षण घेत असतानाच स्वराने क्रिकेटची सुरुवात केली. पहाटे सहा वाजता धनसे मैदान, माणगाव येथे तिने प्राथमिक सराव केला.

  • Que: स्वराच्या यशाबद्दल कुणी अभिनंदन केले आहे?

    Ans: खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे, चेअरमन अरुण पवार, शाळेचे शिक्षकवृंद व क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे.

  • Que: स्वराच्या यशाचे माणगावसाठी महत्त्व काय?

    Ans: स्वराचे यश हे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी असून शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करता येते, याचा जिवंत दाखला आहे.

Web Title: Schoolgirl selected in raigad district cricket teamswara bamgudes dream comes true

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • cricket
  • education news
  • Sports News

संबंधित बातम्या

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
1

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक

मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे, नवा विक्रम केला नावावर
2

मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे, नवा विक्रम केला नावावर

IND W vs SL W 1st T20 Live Streaming : भारत-श्रीलंका महिला संघाचा पहिला T20 सामना मोफत कसा पाहता येईल? स्मृती मानधनावर असेल लक्ष
3

IND W vs SL W 1st T20 Live Streaming : भारत-श्रीलंका महिला संघाचा पहिला T20 सामना मोफत कसा पाहता येईल? स्मृती मानधनावर असेल लक्ष

WTC point Table मध्ये इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट, ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम! जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

WTC point Table मध्ये इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट, ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम! जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.