Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा, CM Devendra Fadnavis यांची माहिती

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पालघरमध्ये वाढवण बंदर परिसरात मोठे रासायनिक औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 07:24 PM
महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा, CM Devendra Fadnavis यांची माहिती

महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा, CM Devendra Fadnavis यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार
  • महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांना बूस्टर
  • ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्रा’तून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा
 

रासायनिक उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण तयार करीत असून, हे धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. वाढत्या औद्योगिक गरजा, गुंतवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही वातावरण यांचा विचार करून हे धोरण तयार करण्यात येत असून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या परिसरात मोठे रासायनिक उद्योग केंद्र विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे 3,600 उद्योग रासायनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. देशाच्या रासायनिक उद्योगातील एकूण स्थूल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा सुमारे 19 टक्के, तर रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे 17 टक्के वाटा आहे.
राज्यात पेट्रोकेमिकल्स, कृषी रसायने, विशेष रसायने, पॉलिमर आणि औद्योगिक रसायनांच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. रासायनिक उद्योगासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या अपेक्षा विचारात घेण्यात आल्या आहेत.

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्रा’तून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा

उद्योगांना परवानग्या मिळविणे सुलभ व्हावे, गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि उद्योगांना विविध विभागांच्या प्रक्रियांमुळे अडथळे येऊ नयेत, यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी ‘मैत्री’ हे एक खिडकी व्यासपीठ आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाढवण बंदरामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या बंदराच्या परिसरात रासायनिक उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगांचे समूह विकसित करण्याची संधी आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या भव्य रसायन उद्यान योजनेच्या माध्यमातूनही महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क

देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राने जागतिक स्तरावर महत्वाचे स्थान मिळवले असले, तरी औषधनिर्मितीसाठी आवश्यक सक्रिय औषधघटकांच्या (एपीआय) उत्पादनात अधिक स्वावलंबन आवश्यक आहे. यासाठी बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादन वाढविण्याची गरज असून, महाराष्ट्रातही या क्षेत्रासाठी आवश्यक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

भारताला रासायनिक उद्योगात नवी संधी

रासायनिक उद्योग हा बांधकाम, औषधनिर्मिती, वाहननिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी, खते, पॅकेजिंग आणि पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा आहे. या उद्योगातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देणे आवश्यक आहे. जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये निर्माण झालेल्या बदलांमुळे भारताला रासायनिक उद्योगात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
या संधींचा लाभ घेऊन देशांतर्गत उत्पादन वाढविणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान मजबूत करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सध्या या क्षेत्रातून महाराष्ट्रात सुमारे तीन लाख रोजगार उपलब्ध झाले असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दुप्पट करण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’

यावेळी युपीएल उद्योग समूहाचे अध्यक्ष जय श्रॉफ, रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, रसायने मंत्रालयाचे सचिव तेजवीर सिंग यांनी यावेळी रसायने उद्योग क्षेत्राशी संबंधित मनोगत व्यक्त केले. फिक्कीच्या रसायने विभागाचे अध्यक्ष बिमल गोकुळदास यांनी आभार मानले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण कधी जाहीर होणार आहे?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

  • Que: महाराष्ट्रात रासायनिक उद्योगांचे मोठे केंद्र कुठे विकसित करण्यात येणार आहे?

    Ans: पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या परिसरात मोठे रासायनिक औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे.

  • Que: महाराष्ट्रात रासायनिक क्षेत्रात किती उद्योग कार्यरत आहेत?

    Ans: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे ३,६०० उद्योग रासायनिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Web Title: Cm devendra fadnavis chemical industry policy palghar vadhavan port rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Medicines Issue

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
1

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी
2

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
3

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी
4

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.