
SCI Mumbai Recruitment 2026: (फोटो- सोशलमीडिया)
Shipping Corporation of India Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई म्हणजेच SCI मुंबईने नवीन भरती काढली आहे. यात मुख्य व्यवस्थापक कायदेशीर या पदासाठी जागा आहे.ही भरती सप्टेंबर 2026 च्या जाहिरातीमध्ये आली आहे. एकूण जागा एक असून पगार चांगला दिला जाईल. मुंबईत नोकरी करायची संधी हातातून जाऊ देऊ नका. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2026 आहे. SCI Mumbai Recruitment 2026:
उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणं गरजेचं आहे. LLB किंवा LLM पूर्णवेळ कोर्स झालेला असावा आणि त्यात कमीत कमी 60 टक्के मार्क्स असावेत. त्याबरोबरच अनुभवपण लागणार आहे. ज्यांनी मोठ्या कंपनीत कायदेशीर विभागात काम केलं आहे त्यांना पहिले प्राधान्य मिळेल.
1 ऑगस्ट 2026 रोजी तुमचं वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावं. SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिकांना सरकारी नियमानुसार वयात सूट मिळेल. परंतू सगळ्या सूट मिळून पण वय 50 वर्षांपेक्षा जास्त होता कामा नये.
Pune Recruitment 2026: पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये नोकरीची संधी; ‘या’ तारखेला थेट मुलाखत