फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Air Force School Pune Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणी तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे येथील एअर फोर्स स्कूल, चंदननगर (Air Force School Chandan Nagar) येथे विविध पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध झाली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासांठी लवकरात लवकर अर्ज करावेत. ही भरती नियमित किंवा कंत्राटी तत्वावर (Regular/Contractual) होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
एअर फोर्स स्कूल, चंदननगर येथे प्रशिक्षित पदवीधर इंग्रजी शिक्षक (टीजीटी – हा असा शिक्षक असतो ज्याने पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासोबतच शिक्षणशास्त्रात पदवी (B.Ed. किंवा समतुल्य शिक्षण) घेतलेले असते.) या पदासाठी १ जागा तर कंम्प्युटर शिक्षक पदासाठी १ जागा भरण्यात येणार आहे. तसेच यासोबत प्राथमिक शिक्षक पदासाठी (पीआरटी) ३ जागा भरण्यात येणार आहेत तर ज्युनियन लायब्रेरिअन (Junior Librarian)आणि क्लार्क (Clerk) पदासाठी प्रत्येकी अनुक्रमे १-१ पदे भरल्या जाणार आहेत.
NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड
1. सर्वप्रथम उमेदवारांनी शाळेच्या अधिकृत संकेतस्थाळावरून (afscn.edu.in) अर्जाचा नमुना डाउनलोड करावा.
2. त्यानंतर अर्जातील माहिती काळजीपूर्वक वाचून तो अचूकरित्या भरावा.
3. आता पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसह शाळेच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा.
4. तसेच, भरलेल्या अर्जाची स्कॅन प्रत vacancyafscn09@gmail.com या ईमेलवर पाठवणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी थेट १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता मुलाखत घेतली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी शाळेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ज्यांना उमेदवारांना विद्यार्थ्यांना शिकवण्यास आवडते.तसेच ज्याचे मन विद्यार्थ्यांसमवेत रमते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.






