Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाच्या संकेतस्थळावरील माहिती केवळ इंग्रजीत उपलब्ध असल्याने ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ, मुदती चुकणे आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब शिवसेनेचे सचिव अॅड. वैभव मारुती थोरात यांनी मांडली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, एमबीए, एमएमएस, विधी, बीएड, एमएड, हॉटेल मॅनेजमेंट तसेच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. या प्रक्रियेशी दरवर्षी राज्यातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालक जोडलेले असतात. मात्र, कक्षाकडून विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रसिद्ध केली जाणारी परिपत्रके व इतर माहिती केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ती समजून घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरील सर्व माहितीपत्रके मराठी भाषेतही प्रसिद्ध करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे सचिव अॅड. वैभव मारुती थोरात यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली आहे.

Government Vs Private Universities: भारतात खाजगी विद्यापीठांचा महापूर; पण विद्यार्थ्यांचा कौल अजूनही सरकारी कॉलेजनाच!

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, एमबीए, एमएमएस, विधी, बीएड, एमएड, हॉटेल मॅनेजमेंट तसेच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. या प्रक्रियेशी राज्यातील लाखो विद्यार्थी जोडलेले आहेत. मात्र, सीईटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे प्रवेशाचे वेळापत्रक, महत्त्वाच्या सूचना, मार्गदर्शक पुस्तिका, परिपत्रके आणि इतर माहिती प्रामुख्याने इंग्रजी भाषेतच उपलब्ध करून दिली जाते.

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील किंवा शहरी भागातील नसून, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे इंग्रजीतील सूचना समजून घेण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. परिणामी, प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होणे, चुकीची माहिती मिळणे, अर्जाच्या मुदती चुकणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या घटना घडतात, असे अॅड. वैभव थोरात यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आपल्या संकेतस्थळावर सर्व माहिती मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Childhood Education Course Australia: ऑस्ट्रेलियात ‘या’ शॉर्ट कोर्सला आहे प्रचंड मागणी; शिक्षण पूर्ण होताच मिळेल त्वरित नोकरी!

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेली प्रवेश प्रक्रिया मराठी भाषेत उपलब्ध करून देणे ही केवळ सोय नसून विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. शासनाच्या विविध विभागांकडून मराठी भाषेत माहिती उपलब्ध करून दिली जात असताना, सीईटी कक्षानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे अॅड. वैभव थोरात यांनी म्हटले आहे.

Web Title: Shiv sena demands the cet website be made available in marathi as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • CET
  • CET Exam
  • maharashtra

संबंधित बातम्या

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
1

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
2

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
3

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
4

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.