Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉ चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; SLAT 2027 परीक्षा तारखा आणि प्रवेश प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

Law Entrance Exam: सिम्बायोसिस इंटरनॅशनलतर्फे SLAT 2027 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनची तारीख, पात्रता आणि परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 19, 2026 | 01:36 PM
symboise

symboise

Follow Us
Follow Us:

Law Entrance Exam: सिम्बायोसिस इंटरनॅशनलकडून लवकरच सिम्बायोसिस लॉ एडमिशन टेस्ट (SLAT) २०२७ परीक्षेची नोंदणी सुरू केली जाईल. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असेल. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया वापरता येईल. अंडरग्रॅजुएट लॉ प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी एसएलएटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असते. अधिकृत वेळापत्रकानुसार SLAT २०२७ च्या रजिस्ट्रेशनसाठी ४ डिसेंबर २०२६ पर्यंत विंडो सुरू राहील. या परीक्षेच्या तारखेची घोषणाही करण्यात आली असून, आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून सर्व सविस्तर माहिती पाहूया.

सिम्बायोसिस लॉ एडमिशन टेस्ट २०२७ ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल. या वर्षी १९ डिसेंबर आणि २६ डिसेंबर २०२६ रोजी SLAT परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा सुमारे ६८ शहरांमध्ये आयोजित केली जाईल. जे विद्यार्थी सिम्बायोसिस लॉ स्कूलच्या लॉ प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, ते यासाठी अर्ज करू शकतात.

या तारखांची नोंद ठेवा

सिम्बायोसिस इंटरनॅशनलच्या अधिकृत घोषणेनुसार, सिम्बायोसिस लॉ एडमिशन टेस्टच्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२६ आहे. SLAT टेस्ट १ चे प्रवेशपत्र ११ डिसेंबर २०२६ रोजी जारी केले जाईल. तर, SLAT टेस्ट २ चे प्रवेशपत्र १८ डिसेंबर २०२६ रोजी जारी केले जाईल. परीक्षेच्या तारखांबद्दल बोलायचे तर, SLAT टेस्ट १ परीक्षा १९ डिसेंबर २०२६ रोजी होईल. तर, SLAT टेस्ट २ परीक्षा २६ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल.

कोण करू शकते रजिस्ट्रेशन?

SLAT २०२७ रजिस्ट्रेशनसाठी पात्रतेचा विचार केला तर, उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे इयत्ता १२ वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. गुणपत्रिकेत किमान ४५ टक्के गुण असणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी २०२७ मध्ये इयत्ता १२ वीची परीक्षा देणार आहेत, ते देखील अर्ज करू शकतात. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.

कुठे जाऊन अर्ज करू शकता?

पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट (slat-test.org) वर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आणि अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करता येईल.

Scholarship 2026: परदेशात शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या सरकारच्या ‘या’ स्कॉलरशिपला अर्ज करण्याची प्रक्रिया!

रजिस्ट्रेशन कसे करावे?

1. सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा.

2. होमपेजवर अर्जाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

3. नवीन अर्जदार म्हणून आधी रजिस्ट्रेशन करून घ्या.

4. लॉगिन केल्यानंतर अर्ज (अप्लिकेशन फॉर्म) उघडेल.

5. अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा.

6. मागितले जाणारे कागदपत्रे सबमिट करा आणि फोटो अपलोड करा.

7. स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत देखील अपलोड करा.

8. अर्ज शुल्क – २,२५० रुपये भरा, जे प्रत्येक टेस्टनुसार आकारले जाते.

9. अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करून टाका.

10. शेवटी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट नक्की काढून ठेवा.

UGC NET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; परीक्षा पुन्हा न घेण्याच्या मागणीसाठी NTA कार्यालयावर धडक!

SLAT २०२७ परीक्षेचा पॅटर्न काय आहे?

SLAT २०२७ परीक्षेच्या पॅटर्नबाबत बोलायचे तर, प्रश्नपत्रिका ५ विभागांमध्ये असेल. यामध्ये लॉजिकल रीझनिंग, ॲनालिटिकल रीझनिंग, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, सामान्य ज्ञान आणि लीगल रीझनिंग या विषयांसंबंधित प्रश्न विचारले जातील. हे पाचही विभाग मिळून ६० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी १ गुण मिळेल, म्हणजेच एकूण ६० गुणांची ही परीक्षा असेल.

Web Title: Slat 2027 exam date registration marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Admission News
  • education
  • law

संबंधित बातम्या

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
1

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम
2

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र
3

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
4

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.