career (फोटो सौजन्य : social media)
तुम्हाला कोणी असं म्हंटल की ९ तास झोपून तुम्हाला लाखो रुपये मिळणार, तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल पण हे खरं आहे. एका कंपनीने हा अनोखा प्रकार राबवण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये निवडलेल्या लोकांना दररोज ९ तास झोपावे लागणार आहे. त्या बदल्यात त्यांना १० लाख रुपये मिळवू शकतात. या ऑफरचं उद्देश लोकांना झोपेचे महत्व समजावून सांगणे आहे.
IIT Bombay INTERNSHIP: आईआईटी बॉम्बेमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी; अशाप्रकारे करता येईल आप्लाय
आपल्या सर्वांना वाटतं की दिवस भर झोपावं. दररोज 8 ते 9 तास ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याने झोप येते. परंतु कामामुळे आपण झोपत नाही. पण झोप हीच तुम्हची नोकरी बनली तर काय? वेकफीट कंपनी ही संधी देत आहे. वेकफिट ही देशातील प्रसिद्ध फर्निचर आणि गाद्या बनवणारी कंपनी आहे. कंपनीने त्यांच्या “स्लीप इंटर्नशिप” चा पाचवा सीझन सुरु केला आहे. ज्यामध्ये निवडलेल्या लोकांना दररोज 9 तास झोपावे लागणार आहे. एवढेच नाही तर झोपताना तुम्हाला त्या गाद्यांबद्दलचा तुमचा अनुभव कंपनीला सांगावा लागेल. म्हणजे तुमच्या झोपेचा फायदा कंपनीला होतो आणि तुम्हाला पैसे मिळतात.
झोपण्याचे तुम्हाला किती पैसे मिळतील?
या “स्लीप इंटर्नशिप” मध्ये तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जाणार असे कंपनीने स्पष्ट केले आहे. म्हणजेच तुम्ही जितके चांगले झोपाळा तितके तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. वेकफीटने अशी ऑफर आधी देखील दिले आहेत. गेल्या चार हंगामात अनेकांनी या अनोख्या कामातून खूप कमाई केली आहे.
कुठे आणि कसे कराल अर्ज?
कंपनीने ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त इंटरनेटवर वेकफिट स्लीप इंटर्नशिप शोधावी लागेल. तिथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला अप्लाय नाऊचा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करा. तिथे एक फॉर्म उघडेल त्यात तुमची माहिती भर आणि सबमिट करा. फॉर्ममध्ये, तुम्हाला हे देखील विचारले जाईल की कंपनीने तुम्हाला या भूमिकेसाठी का निवडावे. म्हणजेच, तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही सर्वोत्तम “स्लीपर” का आहात. जर तुमचे उत्तर कंपनीच्या व्हिजनशी जुळत असेल, तर तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल.
या आधीच्या विजेताला किती मिळाली रक्कम?
पूजा माधव वाव्हळ ही पुण्याच्या यूपीएससी (UPSC) इच्छूक उमेदवार आहे, जिला भारताची “स्लीप चॅम्पियन” म्हणून गौरविण्यात आले आहे. तिने एका अनोख्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्राममध्ये भाग घेऊन दररोज रात्री नऊ तास झोपण्याची अट पूर्ण केली आणि यातून तिला ₹९.१ लाखांचे बक्षीस मिळाले. १ लाखांहून अधिक अर्जदारांमधून निवड होऊन तिने हा मान मिळवला आहे.
Delivery Boy ला किती मिळतो पगार? 36000 महिन्याची कमाई, कसे मिळते पार्सल डिलिव्हरीचे काम