Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी

एसएनडीटी महिला विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लागू केलेल्या १०० टक्के शुल्क सवलत योजनेचा हा परिणाम आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 04:05 PM
SNDT female students number increasedoffering a 100% fee waiver for women pursuing higher education scheme

SNDT female students number increasedoffering a 100% fee waiver for women pursuing higher education scheme

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे : पुणे : राज्य सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लागू केलेल्या १०० टक्के शुल्क सवलत योजनेचा परिणाम म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठात (SNDT) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत प्रवेशसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढून सध्या सुमारे १ लाख ८ हजार १२३ विद्यार्थिनी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. स्त्री शिक्षणासाठी समर्पित असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात विविध पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाची सहा शैक्षणिक संकुले, ३७ विभाग आणि ३८४ संलग्न महाविद्यालयांद्वारे सुमारे ३०० हून अधिक अभ्यासक्रम राबवले जातात. (Pune News)

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मुलींसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा उपलब्ध झाल्याने या संधी खेड्यापाड्यांतील विद्यार्थिनींपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी मुलींना शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांतील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेणे सोपे झाले असून, प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, डेटा सायन्स यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सामान्यतः या अभ्यासक्रमांचे शुल्क जास्त असते मात्र शुल्क सवलतीमुळे विद्यार्थिनींना नाममात्र शुल्कात शिक्षण घेण्याची संधी मिळत असल्याने या अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थिनींचा कल वाढत आहे.

हे देखील वाचा : नवलच! परीक्षेला बसूनही गैरहजर, वर्ष धोक्यात; विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

डॉ. विलास नांदवडेकर सांगितले की, “प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि विश्वासार्ह झाली आहे. प्रशासनाने वेळेत कार्यक्षमतेने काम केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली. तसेच, विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सुविधा, मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, प्रवेश प्रक्रिया अधिक बळकट आणि सुबक करण्यासाठी कॅम्पसनिहाय अॅडमिशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे.”

अभ्यास करण्याची गरज

विद्यार्थिनींसाठी शुल्कमाफी योजना राज्यातील सर्व सरकारी विद्यापीठांना लागू असली तरी इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशसंख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे एसएनडीटी विद्यापीठात प्रवेशसंख्या वाढण्यामागील कारणांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

 

एसएनडीटी महिला विद्यापीठातील प्रवेशसंख्या वाढ

वर्ष विद्यार्थ्यांची संख्या
2022-23 52 हजार 293
2023-24 61 हजार 834
2024-25 84 हजार 331
2025-26 1 लाख 8 हजार 123

 

हे देखील वाचा : Degreeचे निकष बदलले! ‘या’ महाविद्यालांमध्ये तीन नाही तर चार वर्षांचा अभ्यासक्रम, मार्गदर्शक सूचना जाहीर

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव म्हणाल्या की, “नवीन इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स, फॅशन डिझाइनसारखे आधुनिक अभ्यासक्रम आणि कौशल्यविकास केंद्रांच्या स्थापनेमुळे विद्यार्थिनींचा कल वाढत आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही उच्च शिक्षणाच्या संधी मिळत आहेत.”

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले की, “उद्योगाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी आणि प्रवेश प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर यामुळे विद्यार्थिनींना प्रवेश घेणे सोपे झाले आहे. प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे प्रवेशसंख्येत वाढ दिसून येत आहे.”

 

Web Title: Sndt female students number increasedoffering a 100 fee waiver for women pursuing higher education scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • education news
  • pune news
  • SNDT

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.