Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ अभियान! जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्यासाठी विशेष उपक्रम

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्यासाठी ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नये हा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2026 | 04:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गांत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत आणि एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली.

कसे बनता येईल Social Media Influencer? मार्ग कठीण, पण ट्रिक्स सोप्या

अलीकडच्या काळात जन्मदर कमी होत असल्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. त्याचबरोबर काही मुले शाळाबाह्यही राहतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि पालकांना जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत जागरूक करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. काही खासगी शाळांकडून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असून या अभियानामुळे जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक वाढेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी त्यांच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीचे प्रवेश देण्याची परंपरा सुरू केली आहे. यंदाही ही परंपरा पुढे चालू ठेवण्यात येत असून जिल्हाभरातील अधिकाधिक शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असा संकल्प शिक्षक संघाने केला आहे. ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ या अभियानाअंतर्गत १९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी वर्ग घेण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये लहान मुलांना खेळ, गाणी, गोष्टी यांद्वारे शाळेच्या वातावरणाशी परिचित करून दिले जाईल. त्यामुळे मुलांना शाळेत राहण्याची सवय लागेल आणि शिक्षणाची आवडही निर्माण होईल.

नोकरी सांभाळून केला अभ्यास अन् सृष्टी झाली IAS! आईचा संघर्ष पाहून मिळाली प्रेरणा

या अभियानात राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, संजय भुमे, बाबासाहेब जाधव, बळीराम भुमरे, प्रशांत हिवर्डे, किशोर पळसकर, बी.डी. जाधव, योगेश शिसोदे, संजय बागुल, भास्कर चौधरी, नारायण साळुंके, कल्याण राऊत, कृष्णा पाटील, लक्ष्मीकांत कोलते, पांडुरंग अंभोरे, राजू लहाने, ईश्वर वैष्णव, बाळासाहेब हिलाले, दिवाकर चोपडे, राजेश पवार, विनोद जाधव, महेश कापुरे, योगेश खरात, प्रदीप मोरे, तिलकेश्वर सिरसाट, शमीम पठाण आदी पदाधिकारी आणि शिक्षक सक्रियपणे पुढाकार घेत आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशात वाढ होईल आणि ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Special initiative to increase student admissions in zilla parishad schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Gudi Padva
  • Gudi Padwa

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.