Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णतेचा हाहाकार! शाळा १५ ऐवजी २६ जूनपासून सुरू करा; प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षणमंत्र्यांकडे आग्रही मागणी

महाराष्ट्रातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळा १५ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून ९ जूनला सुनावणी होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 28, 2026 | 02:17 PM
महाराष्ट्रात उष्णतेचा हाहाकार! शाळा १५ ऐवजी २६ जूनपासून सुरू करा

महाराष्ट्रात उष्णतेचा हाहाकार! शाळा १५ ऐवजी २६ जूनपासून सुरू करा

Follow Us
Follow Us:

 

  • महाराष्ट्रात उष्णतेचा हाहाकार!
  • शाळा १५ ऐवजी २६ जूनपासून सुरू करा
  • प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षणमंत्र्यांकडे आग्रही मागणी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शाळा नेहमीप्रमाणे १५ जून रोजी सुरू करण्याऐवजी २६ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरवर्षी विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होतात. मात्र, यंदा संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची आहे. विक्रमी सविता किया पातळीवर पासूनचली के जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. हवामान खात्यानेही जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातही तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती व वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ४४.५ ते ४६.२ अंशांदरम्यान नोंदवले गेले असून, ८५० हून अधिक उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी १२० हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील लातूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे देखील उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

संभाजीनगर जिल्ह्यातदेखील ४३ अंशापर्यंत तापमान गेल्याने विशेष करून लहान मुलांना उन्हामुळे तास होण्याची शक्यता अधिक बळावली असल्याचे शिक्षक समितीने निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी पायी, सायकलने किंवा एसटी बसने प्रवास करत असल्याने दुपारच्या कडक उन्हात त्यांचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने संवेदनशील भूमिका घेत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी शिक्षक समितीने आहे. या संदर्भात शिक्षक समितीतर्फ उदय शिदि, विजय कोंबे, राजन कोरगांवकर, किशोर पाटील यांनी शासनाला निवेदन सादर केले आहे. तसेच या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्यावर पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार असल्याची माहिती सतीश कोळी यांनी दिली आहे.

आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता

५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना उष्णतेचा अधिक फटका बसू शकतो. दुपारच्या वेळेत शाळेतून घरी परतताना विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या होणे तसेच उष्माघाताचा धोका संभवतो. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये अद्याप पुरेशा प्रमाणात पखे, थंड पिण्याचे पाणी किवा ओआरएसची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता असल्याचे समितीने म्हटले.

अतिरिक्त तासिकेतून तूट भरून काढता येईल

२६ जूनपर्यंत उष्णतेची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार किंवा रविवारी अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि जीवित सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

Web Title: Start schools on the 26th instead of the 15th teachers association urges education minister amidst current heatwave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Schools

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.