Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी

नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 06:33 PM
नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी

नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आल्याने, नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या प्रोफाईलवर नजर टाकली असता त्यांचे थेट एनटीएशी कनेक्शन असल्याचे समोर येत असून, मुळात यंत्रणाच पोखरली गेली असल्याचे यातून समोर येत आहे.

 

केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांत पेपरफुटीच्या घटनांबाबत अपेक्षित ती कठोर भूमिका घेतली जात नाही. २०२४ मधील पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही ठीकाणी एनटीएमधील काही अधिकाऱ्यांना बढतीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांकडे गांभीर्याने बघितले जाणार आहे की नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) परीक्षा घेताना यूपीएससी स्तरावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि गोपनीयता पद्धतींचा अवलंब करते. मात्र, नव्या घटनांमुळे या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२४ साली झालेल्या अशाच प्रकारानंतर कारवाईचा फार्स झाला; मग कडक सुरक्षा असतानाही पेपर फुटतात याचाच अर्थ यंत्रणेतच काहीतरी गडबड आहे हे सांगण्यास कोण्या तज्ज्ञाची गरज नाही, असे बोलले जात आहे.

पेपरफुटी प्रकरणात समोर येणारी काही नावे ही केवळ प्यादे असू शकतात. प्रत्यक्षात या रॅकेटमागे मोठे जाळे कार्यरत असून, त्याला सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अशा प्रकारच्या घटना घडू शकत नाहीत. महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर नाशिक, राजस्थान, अहिल्यानगर यांसारख्या विविध ठिकाणी पेपरफुटीचे धागेदोरे आढळून येत आहेत. यात जो कोणी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. – डॉ. सुदर्शन घेरडे (अध्यक्ष, महाराष्ट्र युवा महासंघ)

विद्यार्थी अन् पालक बोलण्यास तयार नाहीत

यासंदर्भात नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थी तणावग्रस्त अवस्थेत दिसले. प्रतिक्रिया देण्यास अथवा बोलण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. विद्यार्थ्यांचे पालकही तणावग्रस्त मानसिकतेतून जात असल्याने त्यांनीही काहीही बोलण्यास नकार दर्शविला. असेच होत राहिले तर, आता आमच्या पाल्यांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होता.

विद्यार्थी एक-दोन वर्षे प्रामाणिकपणे मेहनत घेतात; मात्र त्या परिश्रमांचे योग्य फळ मिळेल याची खात्री त्यांना राहिलेली नाही. तिसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे अथवा गैरव्यवहारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, त्यांना मानसिक ताण आणि मनोबल खच्चीकरणाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, परीक्षा व्यवस्थेमध्ये अधिक कठोर आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. – मुकुंद किर्दत, प्रवक्ता (आम आदमी पार्टी)

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य

एनटीए परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची अत्यंत कठोर तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कोणतीही संशयास्पद वस्तू नेता येत नाही. संपूर्ण तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही पेपर बाहेर कसा जातो, हा मोठा प्रश्न असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत असून, अनेक विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत.

पुण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालय-क्लासेस टायअप धोरण सर्रास राबविले जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा क्लासेसकडे ओढा वाढत असून, कनिष्ठ महाविद्यालये केवळ नावापुरती उरली आहेत. पेपरफुटी प्रकरणात काही महाविद्यालये व क्लासेसमधील हितसंबंधांची चौकशी करून टायअपचे जाळे तातडीने मोडीत काढावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. – कल्पेश यादव (अध्यक्ष, युवा सेना)

हे सुद्धा वाचा : NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन उघड! मनीषा वाघमारेसह आणखी एकाला CBIची अटक

Web Title: Students are in a state of depression due to neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • NEET Exam
  • pune news
  • Students

संबंधित बातम्या

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
1

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
2

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा
3

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित
4

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.