Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुलींना १००% तर मुलांना ५०% शिक्षण शुल्क माफीचा लाभ

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून मुलींना १००% तर मुलांना ५०% शिक्षण शुल्क माफीचा लाभ दिला जात आहे, अशी माहिती Chandrakant Patil यांनी विधानसभेत दिली

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 15, 2026 | 02:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून मुलींना १०० टक्के तर मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफीचा लाभ दिला जात आहे. या निर्णयाच्या विरोधात जाऊन महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले तर त्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्ती वितरणातील अडचणींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. विधानसभा सदस्य Rais Shaikh यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे बदल केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Buldhana News : विद्यार्थ्यांना ‘अर्थसंकल्प २०२६’चे ज्ञान तेही सोप्या भाषेत! कोल्हेटकर महाविद्यालयाचा उपक्रम

सीईटी डेटा थेट वापरला जाणार

शिष्यवृत्ती अर्जातील माहितीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. यापूर्वी अर्जामध्ये १३८ प्रकारची माहिती द्यावी लागत होती, ती आता ६६ पर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची संख्या १७ वरून ८ पर्यंत आणली आहे.

आता प्रवेश प्रक्रियेत वापरला जाणारा सीईटीचा डेटा थेट शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये वापरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. महाविद्यालयांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून शुल्क प्रतिपूर्तीचा पहिला हप्ता लवकर वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले असून जून महिन्यापर्यंत अनेक प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी ‘अर्न अँड लर्न’ योजना

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार ‘अर्न अँड लर्न’ सारखी नवी योजना राबविण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना दरमहा सुमारे दोन हजार रुपयांचे अतिरिक्त मानधन देण्याचा विचार सरकार करत आहे. या योजनेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी विद्यापीठे, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने निधी उभारण्याची योजना आखली जात आहे. या योजनेत सहभागी विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमधील प्रशासकीय, तांत्रिक किंवा इतर सहाय्यक कामांमध्ये मदत करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवासोबत आर्थिक सहाय्यही मिळेल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेंतर्गत शहरांच्या वर्गवारीनुसार वसतिगृह भत्ता दिला जातो. महानगरांसाठी दरमहा सुमारे ६ हजार रुपये, जिल्हा मुख्यालयांसाठी ५ हजार १०० रुपये आणि तालुका स्तरावर सुमारे ४ हजार ८०० रुपये असा भत्ता १० महिन्यांसाठी दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तब्बल 3 वर्षे अधिछात्रवृत्तीची जाहिरातच नाही? विद्यार्थ्यांचा संघर्ष अन् पाठपुरावा…; विषय काय?

थकीत देयकांबाबत वित्तीय संस्थांशी चर्चा

शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीची थकीत देयके वेळेवर अदा करण्यासाठी काही वित्तीय संस्थांशीही चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. सरकार या संस्थांशी समन्वय साधून महाविद्यालयांचे शुल्क थेट अदा करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

शासकीय योजनांचा लाभ मिळत असूनही काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अवास्तव शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. फॉर्म भरताना होणाऱ्या तांत्रिक चुका टाळण्यासाठी राज्यभरात सुमारे ४० सहाय्यक केंद्रे सुरू करण्यात येणार असून या केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यास मदत केली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या चर्चेत विधानसभा सदस्य Sudhir Mungantiwar आणि Kailas Patil यांनीही सहभाग घेतला.

Web Title: Students enrolled in professional courses are eligible for a tuition fee waiver benefit 100 for girls and 50 for boys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.