
Teacher Recruitment
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे काही निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
एका IAS Officer ला किती प्रमोशननंतर Election Commissioner पदाची जबाबदारी मिळते? जाणून घ्या
दरम्यान, ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि नियुक्तीपूर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली आहे, त्यांच्या नियुक्तीबाबत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी किंवा स्पष्ट मार्गदर्शन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित प्राधिकरणांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.
“शिक्षक भरतीतील उमेदवारांनी निवड प्रक्रियेतील आवश्यक टप्पे पूर्ण केले आहेत. त्यामुळे केवळ आचारसंहितेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. आचारसंहितेचा पूर्ण सन्मान राखून निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन घ्यावे आणि नियमानुसार नियुक्तीची पुढील कार्यवाही करावी,” असे संदीप कांबळे म्हणाले.
आता या निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार का? प्रशासकीय दिरंगाईची जबाबदारी शासन घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.