Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TFI फेलोजच्या येण्याने आराध्याचे बदलले जीवन! शिक्षणाबाबतची भीती झाली दूर, अंगीकृत केले नेतृत्व

आराध्याचा आत्मविश्वासाचा प्रवास TFI फेलोजमुळे बदलला आणि शिकण्याबाबतची भीती दूर झाली. योग्य मार्गदर्शनामुळे इंग्रजी–गणित तिचे आवडते विषय बनले आणि तिच्यात नेतृत्व, टीमवर्क, मूल्यांची जाणीव निर्माण झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 09, 2025 | 04:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रामाणिकपणा, आदर, टीमवर्क आणि संयम ही मूल्ये तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत गेली
  • सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आराध्याला इंग्रजी समजणे सोपे झाले
  • आत्मविश्वासाने एक परिपूर्ण सादरीकरण केले, तेव्हा तिला जाणवले “मीही करू शकते!”
आराध्या, एक साधी, शांत स्वभावाची मुलगी. शिक्षणाबाबत थोडी घाबरलेली, स्वतःवर विश्वास नसलेली. पण तिच्या आयुष्यात टीच फॉर इंडिया (TFI) फेलोज आले आणि तिचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला. आज आराध्या आत्मविश्वासाने उभी आहे, स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगते. (Aaradhya Success Story)

RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप

सुरुवातीच्या काळात आराध्याला शिक्षणात अनेक अडचणी येत होत्या. विशेषत: इंग्रजी विषय तिच्यासाठी कठीण वाटत असे. तिला वर्गात बोलताना संकोच वाटे, चुका होतील या भीतीने ती हात वर करत नसे. पण तिच्या TFI दीदी-भैयांनी तिच्यातील लपलेली चमक ओळखली. त्यांनी तिच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि तिला केवळ अभ्यासच नव्हे तर मूलभूत मूल्यांचे महत्त्वही शिकवले. प्रामाणिकपणा, आदर, टीमवर्क आणि संयम ही मूल्ये तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत गेली.

रूचिता दीदी आणि शिवानी दीदींनी आराध्याला केवळ शिकवले नाही, तर तिला प्रेरित केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आराध्याला इंग्रजी समजणे सोपे झाले. जी भाषा कधी तिला कठीण वाटायची, तीच नंतर तिची आवडती विषय बनली. सुरुवातीला भिती वाटणारा गणित विषयसुद्धा तिच्यासाठी आनंददायी झाला. योग्य शिकवण, योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्यात किती मोठा फरक घडवू शकते, हे आराध्याच्या बदललेल्या शिकण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येते.

TFI च्या वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या वर्गात एकजूट, आपुलकी आणि टीमवर्क कमी जाणवत होतं. पण तिच्या दीदींनी मुलांमध्ये एकमेकांबद्दल आदर, सहकार्य आणि शांततेचे वातावरण निर्माण केले. हळूहळू आराध्या अधिक आत्मविश्वासू झाली, सर्वांसोबत निर्भयपणे बोलू लागली आणि समस्यांचे निराकरण स्वतः शोधू लागली. आराध्याच्या आयुष्यातील एक खास क्षण म्हणजे TFI च्या मोठ्या कार्यक्रमात तिने दिलेले मंचावरचे सादरीकरण. हा क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जेव्हा तिने स्वतःच्या आवाजात, स्वतःच्या आत्मविश्वासाने एक परिपूर्ण सादरीकरण केले, तेव्हा तिला जाणवले “मीही करू शकते!”

२,००० शाळांमधील १० लाख विद्यार्थ्यांना जाहिरात साक्षरतेचं शिक्षण! ‘हा’ राष्ट्रीय शिक्षण उपक्रम सुरू

आज आराध्या स्वतः टीच फॉर इंडिया फेलो बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्या मुलांना वाचता-लिहिता येत नाही, ज्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची तिची इच्छा आहे. ती सांगते की, “माझ्या दीदी-भैयांनी मला बदलले, तसंच मीही एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवू शकले तर तेच माझं खरं यश असेल.” आराध्याची कहाणी ही शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण आहे. ती फक्त पुस्तकी ज्ञानाबाबत नाही, तर आत्मविश्वास, मूल्यांची जाण, स्वतःची ओळख आणि समाजाचे ऋण फेडण्याच्या विचाराबद्दल आहे. TFI फेलोजच्या प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आराध्या आज स्वावलंबी, निर्भय आणि प्रेरणादायी व्यक्ती बनून उभी आहे. भावी पिढ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा तिचा निर्धार मनाला स्पर्श करणारा आहे. आराध्या सांगून जाते. “योग्य मार्गदर्शन, आणि थोडासा विश्वास… एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.”

Web Title: The arrival of tfi fellows changed aaradhyas life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • guide

संबंधित बातम्या

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
1

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
2

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
3

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.