Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेस मुदतवाढ; ३८ हजार २२ शाळांची माहिती अद्याप प्रलंबित

राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेअंतर्गत माहिती भरण्याचे काम प्रलंबित असल्याने ३८ हजार २२ शाळांना २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 21, 2025 | 02:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
  • केवळ २६ हजार ६७६ शाळांनीच माहिती अंतिम
  • २५ डिसेंबर रोजी प्रवेश उपलब्ध
राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आवश्यक ती माहिती भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. राज्यातील तब्बल ३८ हजार २२ शाळांनी अद्याप योजनेसंदर्भातील माहिती अंतिम केलेली नसल्यामुळे संबंधित शाळांना दिलासा देत शासनाने माहिती भरण्यासाठी २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांपासून ते राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत आवश्यक त्या सूचना देणारे आदेश निर्गमित केले आहेत.

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात पोलिस-विद्यार्थ्यांत झटापट; ज्युबली फीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा तिसरा टप्पा राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळांच्या गुणांकन पद्धतीत काही सुधारित सूचना लागू करण्यात आल्या असून त्या सर्व संबंधित घटकांनी काटेकोरपणे अमलात आणाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. दोन्ही शासन निर्णयांमधील सर्व सूचना आपल्या स्तरावरून सविस्तर गुणांकन करणाऱ्या समितीच्या निदर्शनास आणाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १६ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चारमध्ये नमूद केलेल्या उपक्रमांनुसार शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रम, योजना आणि अभियानांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्याच्या स्थितीकडे पाहता १९ डिसेंबरपर्यंत एकूण ३८ हजार २२ शाळांनी माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे आढळून आले आहे. मात्र यापैकी केवळ २६ हजार ६७६ शाळांनीच माहिती अंतिम केली आहे. उर्वरित शाळांची माहिती अद्याप अपूर्ण असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शाळांनी दिलेल्या कालावधीत माहिती अंतिम करावी आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.

रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड ; सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप 

दरम्यान, केंद्रस्तरावर मूल्यांकन प्रक्रियेसाठी समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला २५ डिसेंबर रोजी प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The chief ministers my school beautiful school scheme has been extended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.