Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरप्रकरणी केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच वोट चोर प्रकरणी राहुल गांधी यांच्या विधानावर ताशेरे ओढलेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 03:47 PM
CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Follow Us
Follow Us:
  • एसआयआरबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
  • बीएलएबाबतही महत्त्वाचे विधान
  • एसआयआर प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी जरी संविधान दाखवत असले तरी त्यांचा प्लान काही वेगळाच आहे. त्यांचा हेतू संविधानाला समोर मांडत संविधानिक संस्थांची बदनामी करणे आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांना एक अशी व्यवस्था साकारायची आहे, ज्यामुळे लोकांचा विश्वास संविधानीक संस्थांवरून उठला जाईल व देशात अराजकता पसरेल. जेव्हा जनतेला हे कळेल की, सध्याची संविधानिक संस्था त्यांना न्याय देऊ शकत नाही, तेव्हा या सर्व संस्थांना डाव्या विचारसरणीत ढकलले जाईल. हा राहुल गांधींची एक सुनियोजित डिझाइन आहे.

… मग टीएमसी कशी जिंकली

एसआयआर (SIR) आणि वोट चोरीच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना काही प्रश्न विचारले. ते म्हणाले की, जर एसआयआरच्या माध्यमातून मतदार हटवले गेले, तर टीएमसी (तृणमुल काँग्रेस) कशी जिंकली. ते पुढे म्हणाले की, मी एक प्रश्न विचारू इच्छितो. पश्चिम बंगालच्या निवडणूकांत ज्या क्षेत्रांमुळे एसआयआरमळे मोठ्या प्रमाणात वोट कमी झाले, असे कमीत कमी 15 क्षेत्र आहेत, जिथे टीएमसी जिंकून आली आहे. जर एसआयआरच्या माध्यमातून जर भाजपने विरोधी विचारसरणीच्या मतदारांना हटवले असते, तर त्या मतदार संघात टीएमसी जिंकून कशी आली, हा माझा राहुल गांधी यांना प्रश्न आहे.
फडणवीस म्हणतात की, जिथपर्यंत एसआयआरचा प्रश्न आहे, तर सर्वांना तिथे संधी मिळते. प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रत्येक बूथवर आपला बूथ लेव्हल एजेंट म्हणजेच बीएलए नियुक्त करू शकतो. बीएलएला आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो. आपण मतदार यादीतील एक एक पाने व एक एका नावालर आक्षेप घेऊ शकता.

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

त्यांचा मेंदू चोरीला गेलाय

राहुल गांधींवर तिखट शब्दात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, कोणतीच वोट चोरी झालेली नाही, पण राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. आता जर त्यांचा मेंदू चोरीला गेलाय, तर मी पंतप्रधानांना विनंती करतो की, एखादी अशी कमिटी निर्माण करा, जी त्यांचा मेंदू शोधून परत आणेल, जेणेकरून देशाच्या हितासाठी ते नेहमीच सत्य बोलू शकतील.
तसेच राहुल गांधी यांनी प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे.

ते फक्त विरोधात बोलतात. तुम्हाला ठाऊक आहे की, तुम्हाला जनता स्विकारत नाही व आपल्याकडे मुद्दे ही नाहीत, त्यामुळे काही तरी विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

एसआयआरवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर एखाद्या पात्र मतदाराचे नाव वगळले गेले, तर ते आक्षेप नोंदवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचा नाव मतदार यादीत नाही, तर तेव्हाही आक्षेप घेता येतो. पण या प्रक्रियेत आपण सहभागच नाही घेतला, तर ही प्रक्रिया तुम्हाला कळणार तरी कशी? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच या प्रक्रियेत पाच ते दहा टक्के गोंधळ झाला वा एखाद्या व्यक्तीचे नाव नोंदवायचे सुटले, तर नंतर ती व्यक्ती आपला आक्षेप नोंदवू शकतो असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Web Title: Cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
1

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय
2

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन
3

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
4

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.