
maharashtra drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त (maharashtra drought) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारने सरसकट मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र तसे केले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचेही वडेट्टीवार यांनी आरोप केला असून सहकार मंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.
दुष्काळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने दुष्काळ दौऱ्याचा गाजावाजा केला. शेतकऱ्यांना दिला देऊ असे आश्वासन दिले. समृद्धी महामार्गाच्या आसपासची पाहणी केली. शेतकऱ्यांवर संकट आहे. त्यांच्याकडे पैसे नाही. हातातले पिक गेले आहे. त्यांना वर्ष काढणे कठिण झाले आहे. शेतकऱ्यांना एक लाख मदतीची अपेक्षा होती. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना नाही, असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं आहे. यानंतर त्यांनी एक थेट सवालही केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, सरकार मुहूर्त कसला शोधत आहे? फक्त थातुर मातुर जीआर काढला. जुन्या जीआरमध्ये तरतूद यात आहे. त्यात तालुका निहाय पाऊस तूट आणि कृषी आयुक्त अहवाल नाही. सरसकट मदत असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पण मदत सरसकट केली नाही. या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जवसूली स्थगिती कशी होणार ? तातडीने कर्जमाफी करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
कर्जाबाबत वक्तव्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, कर्जाचे पुनर्गठन करायचे ठरवले आहे, म्हणजे शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली जाणार. यातून काय फायदा होणार? शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यातील पाऊस कमी पडला त्याचा समावेश केला पाहिजे. हेक्टरी एक लाख मदत करा. हेक्टरी मदत करताना अडीच हेक्टर मर्यादा ठेवू नका. पीककर्ज जाचक अटी शर्तीशिवाय माफ करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
सहकार मंत्र्यांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, नुसता दुष्काळ जाहीर केला. पण मदत द्यायला वेळ लागणार, असं सहकार मंत्री सांगतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसतात. मंत्री काजू बदाम खातात, पण मदत द्यायला मात्र उशीर लावतात. पंचनामे करायचा मुहूर्त 5 ऑक्टोबर आहे.
शेतकरी जगणार कसा? अशा पद्धतीने ही शेतकरी फसवूणक आहे. हा जीआर कोरडा आहे. द्यायचं असेल तर मदत त्वरित जाहीर करा, अशा शब्दात वडेट्टीवारांनी टीका केली आहे.
तर दुसरीकडे यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोरड्या दुष्काळाची घोषणा करताना ज्या उपाययोजना सरकारने जाहीर केल्या त्याही कोरड्या ठाक आहेत. २६५ तालुक्यात आज पहिला ट्रिगर लागू केला असला तरी किमान ३ आठवडे आधी हे ट्रिगर लागू करायला हवे होते.