Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कागदापासून स्क्रीनकडे झेप; ई-लायब्ररीमुळे वाचन संस्कृतीचा नवा अध्याय

माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे वाचनाचे पारंपरिक स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत असून, ई-लायब्ररी ही संकल्पना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 18, 2026 | 12:06 PM
कागदापासून स्क्रीनकडे झेप; ई-लायब्ररीमुळे वाचन संस्कृतीचा नवा अध्याय

कागदापासून स्क्रीनकडे झेप; ई-लायब्ररीमुळे वाचन संस्कृतीचा नवा अध्याय

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे वाचनाचे पारंपरिक स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत असून, ई-लायब्ररी ही संकल्पना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉपच्या माध्यमातून हजारो पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने वाचनाची सवय नव्या पद्धतीने विकसित होताना दिसत आहे. पूर्वी वाचनासाठी ग्रंथालयात जावे लागत असे, पुस्तकांची वाट पाहावी लागे किंवा ठरावीक वेळेतच वाचन करावे लागे. मात्र ई-लायब्ररीमुळे ही सर्व बंधने दूर झाली आहेत. आता विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक २४ तास कुठेही बसून वाचन करू शकतात. त्यामुळे वाचनाची सुलभता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

 

ई-लायब्ररीमुळे वाचनाचे स्वरूप केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता विविध डिजिटल माध्यमांमध्ये विस्तारले आहे. ई-बुक्स, ऑडिओ बुक्स, संशोधन लेख, मासिके आणि वृत्तपत्रे एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने वाचकांना विविध प्रकारचे साहित्य सहज मिळू लागले आहे. विशेषतः ऑडिओ बुक्समुळे प्रवासात किंवा इतर काम करतानाही वाचनाचा अनुभव घेणे शक्य झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी मोठी वरदान ठरत आहे. महागडी संदर्भ पुस्तके खरेदी करण्याची गरज कमी झाली असून, अनेक शैक्षणिक संस्था आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शैक्षणिक सामग्री मिळू लागली आहे, ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील लेखक या नात्याने माझ्या प्राथमिक पाहणीनुसार परीक्षार्थींकडून ई-बुक ची मागणी सध्या वाढत आहे. ई-बुक मुळे मुलांचा अतिरिक्त आर्थिक खर्च कमी होतो.ई- लायब्ररी मुळे वाचकांना अभ्यासिकेत जाण्याची गरज भासत नाही त्यामुळे प्रवासातही ते वाचन करू शकतात त्यामुळे वेळेचा सदुपयोग घडून येतो. – अविनाश शितोळे, (द लॉजिक बूस्टर पुस्तकाचे लेखक)

पारंपरिक पुस्तकांच्या स्पर्शाचा अभाव

तथापि, या बदलासोबत काही आव्हानेही समोर येत आहेत. स्क्रीनवर दीर्घकाळ वाचन केल्याने डोळ्यांवर ताण येणे, एकाग्रतेत घट होणे आणि सोशल मीडियामुळे विचलित होण्याची शक्यता वाढते. तसेच पारंपरिक पुस्तकांच्या स्पर्शाचा आणि वाचनाच्या अनुभवाचा अभाव जाणवत असल्याची भावना अनेक वाचक व्यक्त करत आहेत. ग्रंथालयांच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरत आहे. अनेक पारंपरिक ग्रंथालये आता डिजिटल स्वरूप स्वीकारत असून ई-लायब्ररी सेवा सुरू करत आहेत. यामुळे वाचकसंख्या टिकवून ठेवण्यास मदत होत आहे, मात्र त्यासाठी तांत्रिक सुविधा आणि आर्थिक गुंतवणूक आवश्यक ठरत आहे. एकंदरीत, ई-लायब्ररीमुळे वाचनाचे स्वरूप अधिक गतिमान, सुलभ आणि व्यापक झाले आहे. पारंपरिक आणि डिजिटल वाचन यांचा समतोल साधत पुढे जाणे हीच आजच्या काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डिजिटल लायब्ररी ही संकल्पना आजच्या काळामध्ये वरदान ठरणार आहे. ऑनलाइनच्या जमान्यामध्ये डिजिटल पुस्तके हे वाचनासाठी सहज सोपे व स्वस्त पर्याय हा वाचकांसाठी उपलब्ध झालेला आहे. सोशल मीडियामुळे वाचनाचा कल कमी झालेला असताना डिजिटल पुस्तके हे वाचकांसाठी एक नवी क्रांती घडवून आणतील. -किरण निंभोरे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक.

हे सुद्धा वाचा : शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा कडक इशारा

Web Title: The concept of e library has now reached everyone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • book reading
  • laptop
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
1

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
2

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
3

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
4

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.