
दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; 'या' मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद
काही मार्गांवरील बसचे आरक्षण क्षमतेपेक्षाही अधिक
आतापर्यंत ३०० जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले असून, काही मार्गांवरील बसचे आरक्षण क्षमतेपेक्षाही अधिक झाले आहे. प्रवासाचे नियोजन आधीच निश्चित असलेल्या प्रवाशांकडून आगाऊ आरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे. उपलब्ध जागांनुसार ऐनवेळीही प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी आणि वल्लभनगर या ठिकाणांहून जादा बस सोडण्याचे नियोजन आहे.
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित बससह ९०० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ३०० बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांनी शक्यतो आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे. उपलब्ध जागांनुसार ऐनवेळीही प्रवासाची सुविधा मिळू शकेल. — कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी.
महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत अनेक प्रवासी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. खासगी बसच्या तुलनेत एसटीचे प्रवासभाडे किफायतशीर असल्याने दिवाळीच्या काळातही एसटी प्रवाशांसाठी परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय ठरत आहे.
दिवाळीसाठी एसटीचे जादा बस नियोजन :
एकूण जादा बस : ९००
आरक्षण पूर्ण : सुमारे ३०० बस
सर्वाधिक प्रतिसाद : मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्ग
बस सुटण्याची ठिकाणे : स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी आणि वल्लभनगर
महिलांना सवलत : तिकिटात ५० टक्के
अमृत ज्येष्ठ नागरिक : मोफत प्रवास सुविधा
Ans: दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने ९०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
Ans: मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या भागांकडे जाणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.
Ans: महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत मिळते, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.