
राज्यातील १८ हजार शाळांवर संकट कायम, शिक्षकांचे 25 हजार पदे अतिरिक्त (फोटो सौजन्य-Gemini)
संचमान्यता आणि त्याचे धोरण हे शाळा बंद करण्याच्या दिशेने नेणारे सूत्र आहे. यामुळेच निवृत्त होण्याच्या मार्गावर आलेल्या शिक्षकांवर टीईटी लादली गेली. अवाजवी अशैक्षणिक कामाच्या ओझ्याबाबत सरकार कोणताही धोरणात्मक बदल करीत नाही. ती कामे कमी करण्याऐवजी वाढवत आहे. यामुळे ५ डिसेंबरला शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत, असं मत शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे् यांनी व्यक्त केलं आहे.
१५ मार्च २०२४च्या शासन निर्णयामुळे राज्यातील ५ डिसेंबर २०२५ पर्यंत नववी-दहावीच्या वर्गावरील सुमारे १० हजार शाळांसाठी शिक्षक अथवा शिक्षिका कार्यरत ठेवल्या जातील आणि इतरांना अतिरिक्त ठरविले जाईल. इयत्ता सहावी ते आठवीच्या कार्यरत शिक्षकांपैकी सुमारे सात ते आठ हजार शाळांमध्ये केवळ एक अथवा दोन शिक्षक शिल्लक राहतील. इतर अर्थात अतिरिक्त होतील. पाचवीचा वर्ग शिक्षकाविना चालविण्याची स्थिती किमान चार ते पाच हजार शाळांमध्ये निर्माण होईल. याशिवाय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांसह शिक्षकांची २० वे २५ हजार पदे अतिरिक्त ठरतील. राज्यातील २५ ते ३० रात्रशाळा आणि गावतांड्यावरील १८ हजार शाळा बंद होतील.