Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा कडक इशारा

विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 02:52 PM
शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा...; शिक्षण विभागाचा कडक इशारा

शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा...; शिक्षण विभागाचा कडक इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. सर्व शाळांना शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिला आहे.

 

शाळांकडून कोणत्याही विशिष्ट विक्रेत्याकडून गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा दबाव पालक आणि विद्यार्थांनवर टाकता येणार नाही. तसेच या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सर्व शाळा व्यवस्थापनांना देण्याचे सांगण्यात आले आहे. पालक किंवा विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी तत्काळ शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंडळांची पुस्तके वापरावीत

राज्य मंडळ, सीबीएसई व आयसीएसई शाळांनी अनुक्रमे एनसीईआरटी किंवा एससीईआरटी (बालभारती) पाठ्यपुस्तके वापरावीत, तर इतर मंडळांच्या शाळांनी, संबंधित मंडळांनी मान्य केलेलीच पुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेला विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके घेण्यास विद्यार्थ्यांवर सक्ती करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या प्राध्यापक पदांबाबत अखेर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारने ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी दिली असून, येत्या महिनाभरात या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उच्च शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये २० हजारांहून अधिक प्राध्यापक पदे सध्या रिक्त आहेत. कोरोनानंतर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया जवळपास ठप्प झाली होती. अनेक वर्षे नियमित भरती न झाल्याने महाविद्यालयांना कंत्राटी किंवा तात्पुरत्या प्राध्यापकांच्या आधारे शिक्षण सुरू ठेवावे लागत आहे. याचा थेट परिणाम अभ्यासक्रमांचे नियोजन, संशोधन उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्तेवर झाला असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटना आणि महाविद्यालय प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत होत्या. अखेर सरकारने या मागणीची दखल घेत ५,०१२ पदांना मंजुरी दिली आहे. मात्र, ही संख्या एकूण रिक्त पदांच्या तुलनेत कमी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: The education department has issued a stern warning to schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • School
  • Students

संबंधित बातम्या

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
1

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
2

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
3

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
4

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.