Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC Single Girl Child Scholarship: एकुलत्या एक मुलीला उच्च शिक्षणासाठी मिळणार ७२,४०० रुपये; लगेच चेक करा पात्रता!

UGC Single Girl Scholarship: विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) एकुलत्या एक मुलीसाठी 'इंदिरा गांधी पीजी स्कॉलरशिप' दिली जात आहे. उत्पन्नाची अट नसलेल्या या योजनेअंतर्गत २ वर्षात एकूण ७२,४०० रुपये मिळतात. पात्रता निकष आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 05:18 PM
UGC Single Girl Scholarship

UGC Single Girl Scholarship

Follow Us
Follow Us:

UGC Single Girl Child Scholarship: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) ‘पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ (Post Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child) ही योजना चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थिनींना वित्तीय सहाय्य प्रदान केले जाते, जे आपल्या पालकांचे एकुलते एक अपत्य आहे आणि नियमितपणे पदव्युत्तर म्हणजे मास्टर डिग्रीचे (PG) शिक्षण घेत आहेत.

या स्कॉलरशिपला पात्र वि्द्यार्थीनींना दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. जेणेकरून त्या कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील. या स्कॉलरशिपद्वारे प्रतिवर्ष ३६,२०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. दोन वर्षापर्यंत ७२,४०० रुपयांची रक्कम विद्यार्थिनी्च्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. दरवर्षी  ३,००० या शिष्यवृत्तींचा विद्यार्थिनींना फायदा होतो.

Devendra Fadnavis Qualification: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके किती शिकलेले आहेत? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

उत्पन्नाची कोणतीही अट नाही

या स्कॉलरशिपचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे अर्ज करण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाशी संबंधित कोणतीही अट नाही म्हणजेच आर्थिक परिस्थिती काहीही असली तरी पात्र विद्यार्थिनी या योजनेस अर्ज करू शकतील.

काय आहेत पात्रता निकष?

या स्कॉलरशिपला एकुलते एक अपत्य किंवा जुळ्या बहिणी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याऱ्या विद्यार्थिनीचे वय मास्टर डिग्रीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेत्यावेळी ३० वर्षापेक्षा कमी असावे. तसेच ती कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये नियमित आणि पूर्ण वेळ मास्टर डिग्रीच्या कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकत असावी. परंतु, या स्कॉलरशिपचा लाभ व्यवसायिक (Professional) कोर्सेच्या विद्यार्थिनींना घेता येणार नाही.

NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशरा?

असा करा अर्ज

या स्कॉलरशिपसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या (National Scholarship Portal) अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करावा. इच्छुक व पात्र विद्यार्थिनींनी पोर्टवर नोंदणी करून ‘Post Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child’ या योजनेची निवड करावी.

Web Title: Ugc post graduate indira gandhi scholarship for single girl child eligibility apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Girl Child
  • Scholarship Exam
  • UGC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.