Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठ: एलएल.एम. सीईटी परीक्षेच्या पुनर्नियोजनाची बाब विचाराधीन! अंतिम निर्णय अद्याप नाही

मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या एलएल.एम. सीईटी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 08, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विद्यापीठाने ही परीक्षा ७ जून २०२६ रोजी घेण्याचे निश्चित केले
  • दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागू शकते
  • इतर अधिकृत सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार
मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी आयोजित करण्यात आलेल्या एल.एल.एम. कॉमन एंट्रन्स टेस्ट (एलएल.एम. सीईटी) परीक्षेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विद्यापीठाने ही परीक्षा ७ जून २०२६ रोजी घेण्याचे निश्चित केले असले, तरी त्याच दिवशी अखिल भारतीय बार परीक्षा (एआयबीई) देखील होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी एलएल.एम. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी या तारखेमुळे अडचणी निर्माण होणार असल्याचे सांगत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या मागण्यांची दखल घेत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने एलएल.एम. सीईटी परीक्षेच्या पुनर्नियोजनाचा विषय सध्या सक्षम प्राधिकरणांच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी परीक्षा वेळापत्रकात बदल किंवा इतर सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, एआयबीई आणि एलएल.एम. सीईटी या दोन्ही परीक्षा कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून विद्यार्थ्यांचे लक्ष आता विद्यापीठाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

दहावीच्याही निकालात २.०१ टक्क्यांनी घट! राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के; कोकण विभाग अव्वल

विद्यापीठ प्रशासनाने सर्व संबंधित विद्यार्थ्यांना नियमितपणे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. एलएल.एम. सीईटी २०२६ संदर्भातील पुढील निर्णय, सुधारित वेळापत्रक आणि इतर अधिकृत सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: University of mumbai rescheduling of llm cet exam under consideration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Mumbai University

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप
2

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.