Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांची उत्तर प्रदेशातून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासनात अधिकारी म्हणून काम करण्यासाठी इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) पीसीएस 2026 भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीद्वारे विविध महत्त्वांच्या पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 20, 2026 | 11:29 AM
UPPSC PCS 2026 Last date UPPSC PCS 2026 Last date (फोटो सौजन्य- सोशलमीडि

UPPSC PCS 2026 Last date UPPSC PCS 2026 Last date (फोटो सौजन्य- सोशलमीडि

Follow Us
Follow Us:

UPPSC PCS 2026 : दरवर्षी यूपीपीएससी पीसीएस परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे या परीक्षेतून मिळणारी प्रतिष्ठित पदे आणि आकर्षक वेतन. यंदाही आयोगाने गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील सुमारे 500 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मात्र, पुढील काळात विभागांच्या गरजेनुसार या जागांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.

या भरतीतून उपजिल्हाधिकारी (SDM), उपपोलीस अधीक्षक (DSP), गट विकास अधिकारी (BDO), सहाय्यक आयुक्त (व्यापार कर), नायब तहसीलदार, उत्पादन शुल्क निरीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी अशा अनेक जबाबदारीच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.

अर्ज प्रक्रियेला कधीपासून सुरुवात होणार?

अर्ज प्रक्रियेची सुरुवात 25 जून 2026 रोजी झाली होती. अर्जासोबत आवश्यक शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. जर अर्जामध्ये काहीचूक झाली असेल, तर ती 3 ऑगस्ट 2026 पर्यंत दुरुस्त करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. शेवटच्या दिवशी वेबसाइटवर जास्त ताण येण्याची शक्यता असल्याने अर्ज लवकर पूर्ण करणे अधिक सुरुक्षित ठरेल.

शैक्षणिक पात्रता किती पाहिजे?

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. काही विशिष्ट पदांसाठी संबधित विषयातील पदवी आणि अतिरिक्त अटी लागू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहीराक काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती

वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी ‘ही’  गोष्ट नक्की करा….

अर्ज करण्यापूर्वी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) पूर्ण करणे अनिवार्य आहे. OTR क्रमांक नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी प्रथम ही प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर अर्ज भरावा.

निवड प्रक्रियेची रुपरेषा कशी असले?

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल. सर्वप्रथम प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम मुलाखत होईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार अंतिम निवड जाहीर केली जाईल.

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस

अर्ज शुल्कही वेगवेगळ्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 125 रुपये, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 65 रुपये, तर दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ 25 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

कोणत्या पदांवर सातवा वेतन आयोग लागू होईल?

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-10 अंतर्गत 56,100 रुपये मूळ वेतन मिळेल. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर अनेक सरकारी लाभही मिळणार आहेत. त्यामुळे सरकारी सेवेत उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्यांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Web Title: Uppsc pcs 2026 last date to apply soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Exam
  • goverment news
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
1

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!
2

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
3

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
4

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.