Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC & SSC Exam Changes: स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत मोठे बदल! परीक्षा प्रणालीतील ‘या’ बदलामुळे गैरप्रकारांना बसणार आळा

UPSC & SSC Exam Big Changes 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय आहेत नवीन बदल? भरतीचा कालावधी १५ महिन्यांवरून थेट ६ ते १० महिने कमी झाला आणि 'ई-डोजिअर' सिस्टीममुळे उमेदवारांना काय फायदा होणार? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 02, 2026 | 01:57 PM
big change

big change

Follow Us
Follow Us:

UPSC & SSC Exam Big Changes 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वर्ष २०२६ मध्ये कर्मचारी निवड आयोग आणि संघ लोकसेवा आयोग या दोन्ही संस्थांच्या भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद बनवणे हा आहे, जेणेकरून भरतीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि उमेदवारांना जास्त वाट पहावी लागणार नाही.

राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय कर्मचार्‍यांचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, विविध सुधारणांमुळे SSC कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे भरती चक्र आता १५-१८ महिन्यांवरून घटून ६-१० महिने इतकेच राहिले आहे. यामागे पेन-पेपर आधारित परीक्षा पूर्णपणे संगणकावर आधारित करणे, परीक्षेच्या टप्प्यांची संख्या कमी करणे आणि परीक्षेच्या नोटीसचा कालावधी सुमारे ४५ दिवसांवरून कमी करून २१ दिवसांवर आणणे ही मुख्य कारणे आहेत.

घोटाळे रोखण्यासाठी ‘ई-डोजिअर सिस्टीम’

याशिवाय, उमेदवारांच्या कागदपत्रांची सुरक्षा आणि त्यातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी एक ऑनलाईन केंद्रीय ई-डोजिअर सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता उमेदवारांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ऑनलाईन डिजिटल फाईलमध्ये सुरक्षित ठेवली जातील. यामुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी होईल आणि भरती प्रक्रिया अधिक वेगाने व पारदर्शकतेने पार पडेल.

ही यंत्रणा CGL, CHSL आणि JE यांसारख्या अनेक मोठ्या परीक्षांमध्ये आधीच लागू करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया जलद करण्यासाठी आता वर्णनात्मक परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी संबंधित मंत्रालय आणि विभाग करतील. तसेच, भरती लवकर पूर्ण व्हावी यासाठी मुलाखतीची प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे.

हा मुद्दा अलीकडेच संसदेच्या सत्रादरम्यान ‘पेपर लीक’वर झालेल्या चर्चेतही समोर आला होता. तेथे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्राच्या चार प्रमुख भरती संस्था — UPSC, SSC, RRB आणि IBPS — पारदर्शकता वाढवण्यासाठी सातत्याने सुधारणा करत आहेत.

Job & Salary Trends: आता मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ‘या’ शहरांमध्ये झपाट्याने वाढतोय पगार; टीमलीजचा अहवाल जाहीर

SSC CGL मध्ये नवीन पेपर अन् व्हॅरिफिकेशन

याव्यतिरिक्त, SSC CGL 2026 च्या भरतीमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:

नवीन पेपर लागू: असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर या पदांसाठी टियर-२ (Tier-2) परीक्षेत एक नवीन ‘पेपर-३’ जोडण्यात आला आहे. यामध्ये वित्त आणि अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

जागांची संख्या: या वर्षीच्या भरतीमध्ये एकूण १२,२५६ पदे भरली जाणार आहेत, तर गेल्या वर्षी ही संख्या सुमारे १४,५८२ होती; म्हणजेच या वेळी जागांमध्ये काहीशी घट पाहायला मिळाली आहे.

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?

लाईव्ह फोटो व्हॅरिफिकेशन: परीक्षेत कॉपी करणे आणि बनावट उमेदवारांना रोखण्यासाठी ‘लाईव्ह फोटो व्हॅरिफिकेशन’ सारख्या डिजिटल तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत, जेणेकरून परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष वातावरणात पार पडेल.

Web Title: Upsc ssc exam recruitment process major changes 2026 e dossier system cgl pattern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • competitive exam
  • education
  • Jobs Recruitment
  • SSC
  • UPSC

संबंधित बातम्या

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन
1

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…
2

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
3

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी
4

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.