Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinoba Digital App: ‘विनोबा’ अ‍ॅपने बदलला शासकीय शाळांचा चेहरा! विद्यार्थ्यांना कसा होतोय फायदा जाणून घ्या एका क्लिकवर..

Vinoba Digital App SCERT Maharashtra: तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील शासकीय शाळांची गुणवत्ता कशी सुधारत आहे? 'विनोबा' या डिजिटल व्यासपीठामुळे ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला आणि शिक्षकांचे कोट्यवधी तास कसे वाचले? जाणून घ्या या उपक्रमाची सविस्तर माहिती...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 01, 2026 | 05:34 PM
vinoba

vinoba

Follow Us
Follow Us:

Vinoba Digital App SCERT Maharashtra: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या माध्यमातून सुरू झालेल्या ‘विनोबा’ या डिजिटल व्यासपीठाचा विस्तार राज्यातील अधिकाधिक शाळांपर्यंत करण्यात येत आहे.

‘विनोबा’ उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, जीवनकौशल्य विकास, शिक्षक सक्षमीकरण आणि शाळा-पालक संवाद यांना चालना मिळत आहे. महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांतील सुमारे 45 हजार शासकीय शाळा आणि एक लाख 30 हजार शिक्षक या उपक्रमाशी जोडले गेले असून, 31 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या उपक्रमांतर्गत दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश, एनएमएमएस आणि नासासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी सराव चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संबंधित परीक्षांतील यशाचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चार जिल्ह्यांमध्ये 1.3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या एफएलएन मूल्यमापनासाठी साहाय्य करण्यात आले असून, निपुण भारत उद्दिष्टांच्या पूर्ततेत 23 टक्क्यांची सुधारणा नोंदविण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची मिळणार संधी

विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कथाकथन, कविता सादरीकरण, स्पोकन इंग्रजी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरमहा 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या नोंदी या व्यासपीठावर प्राप्त होत आहेत. यवतमाळसह 15 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नन्हे सितारे’ या व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

KVS Report: गेल्या ८ वर्षांत प्राचार्यांची पदे रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले; केंद्रीय विद्यालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी पुण्यासह 25 जिल्ह्यांमध्ये ‘कॉफी विथ सीईओ’ आणि इतर मिळून 1100 हून अधिक प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या डिजिटल प्रणालीमुळे शिक्षकांचा प्रशासकीय कामकाजातील वेळ मोठ्या प्रमाणात वाचून 1.1 कोटी तासांहून अधिक वेळेची बचत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्वयंचलित मूल्यांकन करण्याची सुविधाही उपलब्ध होणार

एससीईआरटी आणि ओएलएफ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार पालक सहभाग वाढविणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना सक्षम करणे, विद्यार्थी क्लब, विद्यार्थी पोर्टफोलिओ, माजी विद्यार्थी नेटवर्क, विविध स्पर्धा आणि जीवनमूल्य शिक्षणासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मूल्यमापन सुविधांद्वारे कविता, कथाकथन आणि स्पोकन इंग्रजी यांसारख्या उपक्रमांचे स्वयंचलित मूल्यांकन करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

Delhi University: दिल्ली विद्यापीठात १ वर्षाच्या पीजी कोर्सेसच्या जागा वाढल्या! पण प्राध्यापक का आहेत चिंतेत?

सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार असून, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Web Title: Vinoba digital app scert olf school education quality improvement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • digital
  • education

संबंधित बातम्या

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
1

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन
2

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…
3

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
4

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.