Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभागच; कौशल्याने जिंकले साऱ्यांचे मन

राज्य स्तरावर करिअर संसद अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विवा महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. या अधिवेशनात विविध मान्यवरदेखील उपस्थित होते. करिअर संबंधित अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 23, 2025 | 05:27 PM
राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभागच; कौशल्याने जिंकले साऱ्यांचे मन
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे १२ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन बारामती ॲग्रो ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते झाले. उद्योजक प्रदीप लोखंडे, उपसचिव गौरव जोशी, उत्तम गायकवाड, ऍड. धनराज वंजारी आणि उपायुक्त राजीव नंदकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वर्चूसा फाउंडेशनला युनेस्कोचा ‘अवॉर्ड ऑफ मेरिट’ मिळाल्याने सांस्कृतिक वारसा जतनास मदत

या अधिवेशनात पालघर जिल्ह्यामधील विरार येथील विवा महाविद्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. करिअर कट्टा पालघर शहर जिल्हा समन्वयक व महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, सहा. प्रा.ओमकरी पोतदार तसेच करिअर संसदचे ११ विद्यार्थी पदाधिकारी पंचासरा यश कांतिलाल, चिंतन राजेश केळसकर, अभिषेक एकनाथ बडवे, अमित दिलीप मिश्रा, क्रिश राकेश राजभर, शामबाला बबन पाटील, कांचन सुनील गुप्ता, पूर्वा दत्तू पाटील, सिध्दी दिपक गावडे, राजू व्यकंटप्पा कुकाली, स्वाती विनोद सिंग सहभागी झाले होते.

दोन दिवसीय अधिवेशनात मुक्त चर्चासत्रात डॉ. सोनाली लोहार यांनी आवाजाची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले, तर
चित्रा उबाळे यांनी करिअर संधी आणि मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांवर मत व्यक्त केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयातील कृषी प्रदर्शनाला भेट दिली. माहिती व तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण शेती कसे करू शकतो तसेच भविष्यात विविध उद्योग जसे की, कुक्कुट पालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अमेरिका येथील गर्जे मराठीचे संस्थापक आनंद गानु यांनी तेथील व्यवसायाबद्दल माहिती दिली. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांसाठी मोफत उत्तम राहण्याची व जेवणाची सोय केली.

या अधिवेशनाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ. वी.श.अडीगल, उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिक्षण मंत्र्यांची जिल्हा परिषद शाळेंना ‘सरप्राईज’ भेटी; विद्यार्थ्यांच्या अपेक्षा घेतल्या जाणून

बारामतीत आयोजित केलेल्या या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजकता आणि व्यावसायिकता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करता आली त्याचबरोबर उज्वल भविष्य आणि करिअर साठी आवश्यक असलेल्या नवीन वाटा यांचे महत्त्व देखील कळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा अंतर्गत नियोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल ठरेल असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी व्यक्त केले.

Web Title: Viva colleges participation in the state level career parliament session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • baramati
  • education news

संबंधित बातम्या

Pune Education News: दहावी–बारावी परीक्षा केंद्रांवर CCTV सक्ती; खासगी शाळा संस्थाचालकांचा विरोध
1

Pune Education News: दहावी–बारावी परीक्षा केंद्रांवर CCTV सक्ती; खासगी शाळा संस्थाचालकांचा विरोध

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
2

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
3

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.