Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Jay Pawar : मंगळवारी जय पवार यांच्या हस्ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर कारवाईचे संकेत दिले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 07:08 PM
Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, 'हे' आहे कारण...

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, 'हे' आहे कारण...

Follow Us
Follow Us:
  • लोकनेते अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित
  • कारखाना अध्यक्षांवर कारवाईचे संकेत
  • पॅनलला शेतकऱ्यांचा भरघोष पाठींबा
 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची घडामोडी ठरली आहे. राष्ट्रवादीचे (अजीत पवार गट) युवा नेते जय पवार (Jay Pawar) यांनी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे अजितदादांच्या आवाजाचा व्हिडिओ तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या व्हिडिओचा वापर प्रचारामध्ये करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी जगताप यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जय पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित

बारामती येथील सहयोग या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत लोकनेते अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा जय पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, माजी नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे उपस्थित होते.

जगतापांवर कारवाई करणार

यावेळी जय पवार म्हणाले, पुरुषोत्तम जगताप यांनी बंड केल्यानंतर त्यांनी अजितदादांच्या नावाचा व फोटोचा वापर आपल्या प्रचारामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून अजितदादांचे फोटो न वापरण्याचे आदेश त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. त्यांच्या भूमिकेबद्दल आम्ही कोणतीही कारवाई करणार नव्हतो. मात्र त्यांनी आपल्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या व्हिडिओचा वापर त्यांच्या प्रचारामध्ये केल्याचे आढळले आहे.
दादांच्या आवाजाचा ऑडिओ देखील त्यांनी वापरला असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. याबाबत कारवाई बाबतचा विचार सुरू आहे. अजितदादांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर गेल्या अनेक वर्ष मनापासून प्रेम करून त्यांना 13 वर्ष सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष केले, मात्र त्यांनी अशी भूमिका घ्यायला नको होती.

Ulhasnagar Traffic Jam : वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती

जगताप यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय माध्यमांना कळवला जाईल. राष्ट्रवादीतील विविध संस्थांचे काही पदाधिकारी जगताप यांच्याबरोबर प्रचारात असल्याच्या प्रश्नाबाबत जय पवार म्हणाले, आम्ही सुरुवातीला पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करू, त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांवर कोणता निर्णय घ्यायचा, याचा देखील निर्णय घेऊ.

तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, अजितदादांच्या विचारानुसार सभासदांच्या हितासाठी व्यवस्थितपणे चालवला जाईल. याची जाणीव सर्व सभासदांना आहे, त्यामुळेच उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळत असल्याचे जय पवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Jay pawar hints at action against purushottam jagtap rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Jay Pawar

संबंधित बातम्या

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
1

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
2

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
3

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
4

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.