
फोटो सौजन्य सोशल मिडिया
फिर्यादीच्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजल्यापासून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ब्रिजस्टोन कंपनीचे १९५/६० आर १६ आकाराचे चार टायर तसेच १६५/७० आर १४,आकाराचे चार टायर, असा एकूण आठ टायरचा मुद्देमाल चोरीला गेला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५१ हजार ४१४ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धन्यादेवो विष्णू क्षीरसागर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या चोरीचा तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक टेळकीकर, हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर व हवालदार सादिक काझी यांनी तपास करून रणजित विलास पवार (वय ३२, रा. कुरुबकर नर्सरी शेजारी, बारामती) व इरफान मणी तांबोळी (वय २२, रा. फलटण रस्ता, लहूजी नगर, बारामती) यांना ताब्यात घेतले आहे.चोरीस गेलेला मुद्देमाल, या गुन्ह्यातील अन्य व्यक्तींचा सहभाग तसेच आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.