Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवेक विद्यालयाचा क्रीडा महोत्सव उत्साहात; ‘यलो हाऊस’ विजेता, पालकांसाठीही बटाटा शर्यत!

विवेक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही बटाटा शर्यत, सॅक रेस आणि बुक बॅलन्स अशा मजेशीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 07:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही बटाटा शर्यत, सॅक रेस आणि बुक बॅलन्स अशा मजेशीर स्पर्धा घेण्यात आल्या
  • प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांकाला ५ गुण
  • मुख्याध्यापकांनी सर्वांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या
पार्कसाईट विभागातील विवेक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव यंदा दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड जोपासण्यासाठी आणि संघभावना वाढवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना यावेळी रेड, यलो, ग्रीन आणि ब्लू अशा चार हाऊस मध्ये विभागण्यात आले होते. या सर्व हाऊस मध्ये सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न! ठाण्यात ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना

विविध स्पर्धांची रंगत

सांघिक खेळांमध्ये कबड्डी, लंगडी, खो-खो, डॉज बॉल आणि क्रिकेट या स्पर्धांचा समावेश होता. तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये धावणे, रिले, क्रॉसकंट्री, बटाटा शर्यत, बुद्धिबळ आणि कॅरम अशा खेळांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही बटाटा शर्यत, सॅक रेस आणि बुक बॅलन्स अशा मजेशीर स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवल्यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले.

समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम नृत्य आणि प्रभावी सामूहिक सहसाहित्य कवायत सादर करून सर्वांचे कौतुक मिळवले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने क्रीडा महोत्सवाचे औचित्य अधिक खुलवले.

‘यलो हाऊस’ ठरले सर्वाधिक गुणांचे विजेते

प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांकाला ५ गुण, द्वितीय क्रमांकाला ३ गुण आणि तृतीय क्रमांकाला १ गुण अशा पद्धतीने गुणांकन करण्यात आले. चुरशीच्या स्पर्धांमध्ये दमदार प्रदर्शन करत यलो हाऊसने १३१ गुणांची कमाई करून विजेतेपद पटकावले.

वैद्यकीय शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्जन विभागाकडे पाठ! छोटीशी चूक पडते महागात म्हणून…

शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी यलो हाऊसचे विद्यार्थी तसेच शिक्षक ललिता सोनावणे आणि रुतुजा गडदे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक विठ्ठल फडतरे आणि सर्व शिक्षकवर्ग, हाऊस लीडर्स, विद्यार्थी प्रतिनिधी, माजी विद्यार्थी आणि पालक यांनी मोठे परिश्रम घेतले. मुख्याध्यापकांनी सर्वांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विवेक विद्यालयाचा हा वार्षिक क्रीडा महोत्सव यंदाही उत्साह, शिस्त आणि क्रीडास्पृहा यांचा सुंदर संगम ठरला.

Web Title: Vivek vidyalayas sports festival is in full swing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
1

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात
2

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास
3

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास

Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज
4

Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.