
fire
Fire Accidents in Narrow Lanes:अनेकदा आपण बातम्यामध्ये ऐकते की, एखाद्या शहराच्या बाजारपेठेत किंवा अरूंद गल्लीत भीषण आग लागली. पण कधी तुम्ही विचार केला आहेत का? की इतर भागांच्या तुलनेत अरुंद गल्लीत अग्निकांडाच्या घटना सर्वात जास्त का घडतात.चला तर मग जाणून घेऊया या दुर्घटनांमागील नेमकी कारणे काय आहेत?
शहरांमधील दुकाने आणि घरांमध्ये लाग लागण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोक इमारती बांधताना सरकारी नियमांचे पालन करत नाहीत. याचे एक मोठे उदाहरण हे आपल्या नुकतेच समोर आले आहे. मालदीव हॉटेलला आग लागली ते प्रत्यक्षात राहण्यासाठी बांधलेले घर होते. ज्याचे नंतर हॉटेलमध्ये रूपांतर केले होते. कोणत्याही नियोजनाशिवाय केलेले बेकायदेशीर बांधकामच आज शहरांमधील मोठ्या अपघातांचे कारण बनत आहे.
अरूंद गल्ल्यामध्ये विजेच्या तारांची संख्या हीच मोठी हीच समस्या असते. या गल्ल्यामध्ये डोक्यावर विजेच्या तारांचे जाळे पसरलेले असते ज्यामुळे आकाशही नीट दिसत नाही. अनेकदा या तारांवर ओव्हरलोडिंग झाल्यामुळे शार्ट सर्किट होते. विजेची ठिणगी पडताच खाली असलेल्या दुकांनांमध्ये आणि घरांमध्ये लगेच आग लागते.
त्यातच या रस्त्यावर अनेक घरे आणि दुकाने एकमेकांना अगदी खेटून बांधलेली असतात. त्यामुळे हवा येण्या-जाण्यासाठी अजिबात जागा नसते. अशा परिस्थितीत जर एखाद्या दुकानात आग लागली तर कोंदट वातावरणामुळे ती लगेच संपूर्ण गल्लीत पसरते. बंद जागांमुळे आगीचा धूर बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे आग वेगाने पसरते.
सर्वात भातीदायक बाब म्हणजे अशा ठिकाणी आग लागल्यानंतर तिथे वेळेवर अग्निशामक दलाचे (फायर ब्रिगेड) पोहचू शकत नाही. कारण मोठ्या गाड्या अरूंद गल्ल्यामध्ये घूसूच शकत नाहीत. जोपर्यंत अग्निशामक दलाचे जवान पाईप जोडून पाणी मारण्याची व्यवस्था करतात, तोपर्यंत आग बऱ्याच प्रमाणात पसरली असते.
त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी विजेच्या तारा भूमिगत करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक गल्लीत लहान अग्निशामक यंत्रे आणि पाण्याची पाईपलाईन असणे आवश्यक आहे, जेणेकरून अग्नीशामक दलापूर्वी स्थानिक लोकंच यावर नियंत्रण मिळवू शकतील.