Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Ticket Holes History: जुन्या रेल्वे तिकिटांच्या दोन्ही बाजूंना लहान छिद्रे का असायची? जाणून घ्या यामागचे रंजक रहस्य!

Railway Ticket Holes History: आज जरी मोबाईलवर क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून डिजिटल तिकीट मिळत असले, तरी पूर्वीच्या कागदी तिकिटांच्या कडांवर असणारी लहान छिद्रे केवळ डिझाईन नव्हती. मग या छिद्रांचा रेल्वेच्या छपाई सुव्यवस्थेशी काय संबंध होता? जाणून घ्या या 'स्प्रॉकेट होल्स'मागचे खास गुपित.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 11:41 AM
railway ticket

railway ticket

Follow Us
Follow Us:

Old Railway Ticket Sprocket Holes: आजच्या काळात तिकिटे मोबाईलवर क्यूआर कोड (QR Code) आणि डिजिटल स्वरूपात सहज मिळतात. पण एक काळ असा होता, जेव्हा रेल्वे स्थानकांवर छोट्या कागदी तिकिटांचे राज्य होते. तुम्ही जुनी तिकीटे पाहिली तर तुम्हाला नजरेस पडेल की तिकीटाच्या दोन्ही बाजूंना लहान लहान छिद्रे (holes) असायची. परंतु, ही छिद्रे का असायची हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया या छिद्रांमागचे रहस्य….

जुन्या रेल्वे तिकिटांच्या कडांवर असलेल्या या लहान छिद्रांना तांत्रिक भाषेत ‘स्प्रॉकेट होल्स’ असे म्हणत. ज्याचा वापर ‘डॉट-मैट्रिक्स’ (Dot-Matrix) प्रिंटरद्वारे केला जात असे. हे ‘स्प्रॉकेट होल्स’ (Sprocket Holes) तिकिट देण्याची प्रक्रिया वेगवान व सुव्यवस्थित ठेवण्यास मदत करत असत. त्यावेळी ही तिकीटे सलग चालणाऱ्या पेपर रोलवर छापली जायची.

Teachers Adjustment: मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना ठाणे, पालघरला पाठवणार? शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर शिक्षकांमध्ये संताप का?

तिकिटांची अचूक छपाई करण्यासाठी छिद्रे आवश्यक

प्रिंटरच्या आत असलेली दातेरी चाके या स्प्रॉकेट होल्समध्ये अचूकपणे अडकून कागदाला पुढे ढकलत असत. यामुळे कागद अजिबात घसरत नसे आणि प्रत्येक तिकिटावर ठरलेल्या जागेवरच प्रिंट व्हायचे. जर ही छिद्रे नसती तर कागद मशिन्समध्ये सरकू शकला असता. ज्यामुळे ट्रेन नंबर, स्टेशनचे नाव, भाडे आणि प्रवासासंबंधित इतर माहिती चुकीच्या ठिकाणी छापली गेली असती. याच कारणामुळे तिकिटाच्या अचूक छपाईसाठी ही छिद्रे आवश्यक मानली जात होती.

कुठे गायब झाली ही छिद्रे?.

काळाच्या ओघात रेल्वेने आधुनिक तिकिट प्रणाली आणि नवीन छपाई तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. थर्मल प्रिंटर (Thermal Printer) आणि डिजिटल तिकीटिंग आल्यावर सलग चालणाऱ्या कागदांची गरज संपली. नवीन मशीनला स्प्रॉकेटहोल्स असलेल्या कागदांची आवश्यकता न उरल्याने तिकिटांच्या कडावरची छिद्रे नाहीशी होऊ लागली. आज जरी ही तिकीटे आपण वापरत नसलो तरी हा एक रेल्वे प्रवांशासाठी जुन्या आठवणींचा भाग आहे, जी छिद्रे कधीकाळी गरज होती.

Top 5 Management Colleges: एमबीए करायचंय? प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्या देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेसची यादी!

Web Title: Why old railway ticket had holes sprocket holes dot matrix printer history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • central railway
  • History
  • Railway Tickets

संबंधित बातम्या

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला
1

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला

Kabaddi Tournament : बीपीटीचा टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय; उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेशी लढत
2

Kabaddi Tournament : बीपीटीचा टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय; उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेशी लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.