फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Top 5 Management Colleges In India: इंडियन इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क २०२६ (IIRF 2026) ने देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर केली आहे. ही रँकिंग वेगवेगळ्या कोर्सेसनुसार दिली आहे. यामध्ये आयआयएम अहमदाबादने अव्वल स्थान पटकावले आहे. अशा परिस्थितीत मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी या टॉप ५ कॉलेजसबद्दल तुम्हाला माहिती असेले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया, मॅनेजमेंट क्षेत्रातील टॉप ५ कॉलेजेसची यादी…..
आयआयआरएफ इंडिया एमबीए रँकिंग २०२६ मध्ये आयआयएम अहमदाबादने पहिल्या स्थानावर आपले नाव कोरले आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध मॅनेजमेंट संस्था मानल्या जाणाऱ्या या संस्थेची स्थापना १९६१ मध्ये झाली आहे. या कॉलेजला ‘भारताचे हार्वर्ड’ असेही म्हटले जाते. उकृष्ट मॅनेजमेंट शिक्षण आणि प्लेसमेंटसाठी याची नावलौकिकता जगभरात आहे.
आपल्या देशातली पहिली इंडियन इन्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही आयआयएम कोलकता आहे. याची १९६१ स्थापना देखील मध्ये झाली असून स्वातंत्र्यानंतर देशाला तांत्रिक प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली होती. आज अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी धडपड करत असतात.
हे आशियातील टॉप मॅनेजमेंट संस्थांपैकी एक मानले जाते. १९७३ मध्ये स्थापलेली ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टता आणि लिडरशिप डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करते. देशभरात या संस्थेच्या यशस्वी कामगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात याने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
भारतातील प्रतिष्ठित स्कूल्सपैकी एक म्हणजे एफएसएस (फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) होय. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या परिसरात असलेले एफएमएस आपल्या चांगल्या दर्जाच्या कामगिरीसाठी आणि प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. १९५४ मध्ये स्थापन झालेली ही संस्था दिल्ली विदयापीठाशी संलग्न आहे. सध्या या संस्थेला आयआयआरएफ रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.
आयआयएम लखनऊचा समावेश देशातील आघाडीच्या मॅनेजमेंट संस्थांमध्ये होतो. १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत कॅट (CAT) स्कोर, शैक्षणिक रेकॉर्ड़ आणि मुलाखतीच्या आधारे प्रवेश दिला जातो. दरवर्षी येथे प्रवेशासाठी हजारो विद्यार्थी अर्ज करतात.






