फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
मुंबईच्या उत्तर पश्चिम व दक्षिण विभागामध्ये ‘अतिरिक्त शिक्षक’ (विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण जास्त असणे) अधिक प्रमाणात असल्याने शिक्षक उपसंचालकांनी विभागस्तरावर शिक्षक समायोजनाचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मुंबईतील अतिरिक्त शिक्षक ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
NEET UG Re-Exam: परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे, यासाठी अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांना प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.
अनिल बोरमार यांनी दिलेल्या या निवेदनात अशी मागणी केली आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेत (जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या) अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांच्या शेकडो रिक्त जागांवर या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.






