Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

Yogesh Soman Workshop: संस्कार भारती साताऱ्यातर्फे आयोजित कथालेखन व कथाकथन कार्यशाळेत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी साहित्यातील अनुभवांच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 02:14 PM
SANGEET

SANGEET

Follow Us
Follow Us:

Yogesh Soman Workshop: कादंबरी लेखन किंवा इतर कोणतेही लेखन करत असताना त्याला आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांची आणि वैयक्तिक अनुभवाची किनार असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदच्या पुणे जिल्हा अध्यक्ष व संस्कार भारतीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिग्दर्शक योगेश सोमण यांनी केले.

संस्कार भारती सातारा जिल्हा समितीतर्फे येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये कथालेखन व कथाकथन कार्यशाळा कथाकथी २६ आयोजित करण्यात आली होती, ते यावेळी बोलत होते.

योगेश सोमण पुढे म्हणाले, कथा कविता किंवा इतर कोणत्या प्रकारचे लेखन करणे सोपे नाही. त्याला आपल्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक अनुभवांची जोड द्यावी लागतेच. शिवाय काही प्रमाणात या लिखाणामध्ये सत्य सुद्धा उतरवावे लागते. तेव्हाच ते लेखन वाचकांच्या हृदयापर्यंत जाऊ शकते.

योगेश सोमण यांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित सहभागीकडून अनेक प्रकारचे कार्यप्रयोग करून घेतले. कथाकथनाच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक मुद्यांवर प्रात्यक्षिकासह चर्चा केली. वेळेचे नियोजन, देहबोली,चेह-यावरील आत्मविश्वास, प्रेक्षकांशी संवाद साधणे, स्वतःच्या आवाजाचा व्यायाम, विविध कथांचे वाचन करून योग्य कथा कशी निवडावी, कथेचे भागश: पाठांतर करणे व नियमित तालीम करणे अशा विविध पैलूंचे महत्व त्यांनी विषद केले.

संस्कारभारतीच्या उपस्थितांचे लक्ष वेधले

सचिव प्रदीप इनामदार यांनी या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णवी आरेकर हिने संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केले. तिचा सत्कार योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार भारतीचे प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांनी केले.

Major Rishabh Singh: राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सैन्यातून अकाली निवृत्ती का घेतली? जाणून घ्या

कथाकथन स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येणार

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारती सातारा जिल्हा समितीच्या नाट्यविधा प्रमुख रसिका केसकर यांनी केले.रुपेश कुंभार आणि मधुसूदन पतकी यांचा सत्कार संस्कार भारतीचे सातारा जिल्हा समिती उपाध्यक्ष संजय दीक्षित यांनी केला. योगेश सोमण यांचा सत्कार दिलीप चरेगावकर यांनी केला. संस्कार भारती तर्फे लवकरच कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आले. यावेळी व्यासपीठावर संस्कार भारती सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, सचिव प्रदीप इनामदार प्रांताचे प्रसिद्धी व प्रचार प्रमुख रुपेश कुंभार, पश्चिम प्रांत साहित्य विधा प्रमुख मधुसूदन पतकी उपस्थित होते.

Railway Recruitment 2026: दक्षिण रेल्वेमध्ये ४,४७१ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

आभार प्रदर्शन सहसचिव संजीव आरेकर यांनी केले. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, सातारा जिल्ह्यातील विविध भागातून आलेले लेखक आणि संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी, लेखक पद्माकर पाठकजी, पत्रकार शरद महाजनी, हेमंत गुजर उपस्थित होते. कु. ऋतुजा देवी व सौ. उज्वला देवी ह्यांनी रेखाटलेली संस्कारभारतीची आकर्षक रांगोळी कार्यक्रम स्थळी लक्ष वेधी होती.

Web Title: Yogesh soman workshop kathakathan satara sanskar bharati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.