फोटो सौैजन्य - Social Media
दुबईचा सुगंध म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला ‘युसूफभाई परफ्युम’ ब्रँड आता केवळ तुमच्या अंगावरील सुगंधापुरता मर्यादित राहणार नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेतही आपली अमिट छाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. देशात सध्या बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. अशा कठीण परिस्थितीत लाखो युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी ‘युसूफभाई परफ्युम’ आशेचा किरण बनून समोर आला आहे. हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शानदार लाँच कार्यक्रमात ‘किंग ऑफ परफ्युम्स’ म्हणून ओळखले जाणारे युसूफभाई यांनी जाहीर केलं की, त्यांच्या ब्रँडच्या भारतातील विस्तारामध्ये तब्बल १० हजारांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. ही बातमी जाहीर होताच, अनेक बेरोजगार युवकांमध्ये आशावाद निर्माण झाला असून सुगंधाच्या या ब्रँडमुळे ‘फ्रेग्रंट वर्कफोर्स’ तयार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या नोकऱ्यांमध्ये उत्पादन, विक्री, पॅकिंग, वितरण, ग्राहक सेवा अशा विविध क्षेत्रांचा समावेश असेल. विशेषतः परफ्युम उद्योगात रुची असणाऱ्या युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ‘युसूफभाई परफ्युम’ हा ब्रँड केवळ परदेशातच नाही तर आता भारतातही स्वतःचा ठसा उमटवणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, आर्थिक साखळी मजबूत होईल आणि युवकांना घरी बसूनच सुगंधमय करिअर घडवण्याची संधी मिळेल.
युसूफभाई परफ्युमकडून लवकरच नोकऱ्यांबाबत संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि कार्यक्षेत्र याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत वेबसाईट किंवा सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. देशात आता सुगंधाचं नव्यानं ‘रोजगार युग’ सुरू होणार आहे!
नक्की काय आहे ‘युसूफ परफ्यूम्स’?
युसूफभाई हे दुबईमध्ये कार्यरत असलेले एक सेल्फ-टॉ़ट परफ्युमर आहेत, जे “स्मृतींच्या सुगंधाचे मास्टर” म्हणून ओळखले जातात. ते ग्राहकांच्या आठवणींवर आधारित खास परफ्युम तयार करतात, जसे की एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेला सुगंध, बालपणातील एखादी आठवण, किंवा विशिष्ट वातावरणाची ओळख.
ते केवळ काही मिनिटांत ५०० पेक्षा अधिक फ्रॅग्रन्स नोंट्स वापरून सुगंध बनवतात. त्यामुळे युसूफभाईच्या सुगंधात एक खास भावनिक स्पर्श असतो. अनेक ग्राहक त्यांच्या कामाचे कौतुक करतात आणि त्यांच्या परफ्युम्सना दीर्घकाळ टिकणारे आणि अनोखे मानतात, तर काही ग्राहक टिकाऊपणा किंवा सुगंधाची स्थिरता याबाबत मिश्र प्रतिक्रिया देतात.