फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे भरती बोर्डाने लोको पायलट भरती २०२६ परीक्षेचे (CBT-1) प्रवेशपत्र जारी केले आहे. या भरती अंतर्गत एकूण ११,१२७ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ही परीक्षा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी CEN 01/2026 अंतर्गत अर्ज केला आहे, ते आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या (RRB) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्डची आवश्यकता असेल.
उमेदवार आपले प्रवेशपत्र रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या पोर्टलवर जाऊन डाउनलोड करू शकतात. लॉग इन करण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्डची गरज भासेल.
१. सर्वप्रथम आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
२. होम पेजवर ‘आरआरबी एएलपी सीबीटी १ एडमिट कार्ड २०२६’ किंवा ‘ई-कॉल लेटर’ या लिंकवर क्लिक करावे.
३. आता आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करावा.
४. लॉगिन करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे.
५. स्क्रीनवर तुमचे प्रवेशपत्र दिसेल.
६. यामध्ये तुमचे नाव, रोल नंबर, फोटो, स्वाक्षरी, परीक्षेची तारीख, शिफ्ट आणि परीक्षा केंद्राचा पत्ता तपासून घ्यावा.
७. प्रवेशपत्र डाउनलोड करून किमान दोन प्रिंटआउट काढून घ्या.
जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल, तर लॉग इन पेजवर दिलेल्या ‘फॉरगेट पासवर्ड’ या पर्यायाचा वापर करू शकता. तसेच, प्रवेशत्रावरील नाव, फोटो किंवा इतर कोणत्याही माहितीत चूक असल्यास त्वरित आपल्या क्षेत्रीय आरआरबीशी संपर्क साधा.
आरआरबी एएलपी प्रवेशपत्र परीक्षेसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. यामध्ये उमेदवार आणि परीक्षेेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. यात खालील गोष्टींचा समावेश आहे:






