Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळवली. नंतर पोलिस पथकाने चंद्रपूर येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2026 | 02:57 PM
आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला आणि १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका आरोपीला चंद्रपूर येथून अटक केली.

सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबा वाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस अंमलदार रमेश मेमाणे, सचिन कदम, रामदास घावटे, किरण घुटे, प्रवीण भालचिमी आणि माऊली लहाणे यांनी सहभाग घेतला.

गेल्या आठवड्यात (दि. ३ ते ४) चंदननगर परिसरातील जुना मुंढवा रोडवरील द्वारकागार्डनजवळ आरोपी सिद्धार्थ झेंडे व एका महिला तक्रारदार यांच्या दुकानात सोने खरेदीच्या निमित्ताने आले. त्यांनी तक्रारदारांचा विश्वास संपादन करून १४ लाख ७८ हजार ७६० रुपये किमतीच्या १०० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन बिस्किटे घेतली. यामध्ये २५ ग्रॅम वजनाची दोन आणि ५० ग्रॅम वजनाची एक बिस्कीट होती. त्यानंतर आरोपीने त्यांना बँक खात्याचा क्रमांक देऊन त्यामध्ये पैसे जमा केल्याचे भासविले. मात्र, संबंधित खात्यात पैसे नसल्याचे समोर आले.

याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळवली. नंतर पोलिस पथकाने चंद्रपूर येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ज्वेलर्सकडून फसवणुकीच्या माध्यमातून घेतलेली सोन्याची बिस्किटे इंदापूर येथील एका सोनाराला विकून त्याबदल्यात रोख रक्कमा घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडून सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी ८ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून विविध व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध यापूर्वी भिगवण आणि विमानतळ पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

Web Title: 14 lakhs fruad by claiming to be a builder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chandrapur Crime
  • crime news

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.